आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Chhattisgarh Narayanpur Naxal Attack Update | Three Jawans Martyrs, Eight Injured In Narayanpur

मोठा नक्षलवादी हल्ला:जवानांनी भरलेल्या बसला नक्षलवाद्यांनी बॉम्बने उडवले; 4 जवान शहीद, 14 जखमी

नारायणपूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्लास्टनंतर बस उडून पुलाखाली पडली. - Divya Marathi
ब्लास्टनंतर बस उडून पुलाखाली पडली.
  • कडेनार परिसरातील धौडाई आणि पल्लेनारदरम्यान घडली घटना, बसमध्ये होते 24 जवान

छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात मंगळवारी नक्षलवाद्यांनी DRG जवानांनी भरलेल्या बसला बॉम्बने उडवले. या हल्ल्यात 4 जवान शहीद झाले असून, 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर, इतर 12 जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.

ब्लास्टदरम्यान बसमध्ये 24 जवान होते, त्यामुळे शहीदांची संख्या वाढू शकते. घटनेची माहिती मिळताच बॅकअप फोर्सला रवाना करण्यात आले आहे. हे सर्व जवान एका मोहिमेतून परत येत होते. या घटनेची पुष्टी DGP डीएम अवस्थी यांनी केली आहे.

शहीद जवानांचे पार्थिव नेताना...
शहीद जवानांचे पार्थिव नेताना...

बस्तरचे IG पी.सुंदरराज यांनी सांगितले की, नारायणपुरमध्ये नक्षलविरोधी आंदोलनानंतर DRG फोर्स परत येत होती. या परिसरात घणदाट जंगल असल्यामुळे नक्षलवाद्यांनी याचा फायदा घेतला. IED ब्लास्टमध्ये ड्रायव्हरसह 4 जवान शहीद झाले. तर, दोन जवान गंभीर असून, इतर 12 जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. जखमी जवानांना हेलिकॉप्टरद्वारे रायपुरला पाठवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...