आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Chhawla Gang Rape Murder Case Update; Pawan Vinod Arrested Delhi Police | Supreme Court

छावला गॅंगरेपमधील निर्दोषीवर आता मर्डर केस:दिल्लीत ऑटोचालकाला भोसकले, तीन महिन्यांपूर्वी SCने निर्दोष सोडले होते

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष ठरवलेल्या छावला गंगरेपमधील आरोपीला दिल्ली पोलिसांनी एका खूनाच्या आरोपाखाली पुन्हा अटक केली आहे. पवन आणि विनोद यांच्यावर रिक्षाचालकाचा खून केल्याचा आरोप आहे. द्वारका विभागाचे डीसीपी एम. हर्षवर्धन यांनी सांगितले की, आरोपींपैकी विनोद हा छावला गॅगरेप प्रकरणातील आरोपी होता. तीन महिन्यांपूर्वीच सुप्रीम कोर्टाने त्याची निर्दोष मुक्तता केली होती.

2012 साली झालेल्या चावला गॅगरेप प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने 7 नोव्हेंबर 2022 रोजी विनोदसह अन्य तिघांना निर्दोष मुक्त केले होते. तर उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालयाने मात्र, त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती.

लुटण्याचा उद्देश, रिक्षाचालकाच्या गळ्यावर वार
डीसीपीच्या म्हणण्यानुसार, 25-26 जानेवारीच्या मध्यरात्री पवन आणि त्याचा साथीदार विनोद यांनी द्वारका परिसरात ऑटो रिक्षा बुक केली. त्यात बसल्यानंतर काही अंतरावर गेल्यावर त्यांनी ऑटोचालकाला लुटण्याचा प्रयत्न केला. याला ऑटोचालकाने विरोध केला असता त्यांनी ऑटोचालकाच्या गळ्यावर चाकूने वार करून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली. पण यामध्ये ऑटोचालकाचा जागीच मृत्यू झाला होता. अनरसिंह असे मृत ऑटोचालकाचे नाव आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले. या घटनेचा तपास केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

काय आहे छावला गँगरेप, 4 मुद्द्यांमध्ये समजून घ्या संपूर्ण प्रकरण

1. उत्तराखंडमधील मुलीवर 14 फेब्रुवारी 2012 रोजी रेप
9 फेब्रुवारी 2012 रोजी उत्तराखंडमधील एका 19 वर्षीय तरुणीचे दिल्लीतील छावला परिसरातून अपहरण करण्यात आले होते. काही दिवसांनी 14 फेब्रुवारीला हरियाणातील रेवडी येथील एका शेतात त्या मुलीचा मृतदेह सापडला होता.

2. मुलीला सिगारेटने जाळले, ऍसिड ओतले
दिल्लीतील नजफगडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी तरुणीला दिल्लीबाहेर गाडीतून घेऊन गेला होता. गँगरेप करताना तिच्या शरीराला सिगारेटने चटके दिले गेले होते. तिच्या चेहऱ्यावर अॅसिड टाकण्यात आले. कारमध्ये ठेवलेल्या अवजारांनी तिच्यावर वार केले. यात तिचा खून केला गेला. या प्रकरणात रवी कुमार, राहुल आणि विनोद यांना आरोपी करण्यात आले होते.

3. गॅंगरेपमधील आरोपींना 2 वर्षाने फाशीची शिक्षा सुनावली
2014 मध्ये ट्रायल कोर्टाने रवी, राहुल आणि विनोद यांना दोषी ठरवलं आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. यावर्षी ऑगस्टमध्ये उच्च न्यायालयानेही फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. न्यायालयाने दोषींना रस्त्यावर फिरणारे जानवर असे भयानक वर्णन केले होते.

4. सर्वोच्च न्यायालयात देखील पोलिसांनी शिक्षा कमी केल्यावर विरोध केला
उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर दोषींनी त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील केले. दिल्ली पोलिसांनी शिक्षा कमी करण्यास विरोध केला. हा गुन्हा केवळ पीडितेविरुद्ध नसून समाजाविरुद्धचा गुन्हा असल्याचे त्यांनी सांगितले. दिल्ली पोलिसांनी हा जघन्य गुन्हा असल्याचे म्हटले होते. आम्ही दोषींना कोणत्याही प्रकारचा दिलासा देण्याच्या विरोधात आहोत. पीडितेच्या वडिलांनीही या प्रकरणातील दोषींना फाशी द्यावी, असे म्हटले होते.

बातम्या आणखी आहेत...