आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना UPA अध्यक्ष बनवण्याचा मुद्दा चिघळताना दिसत आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते पी चिदंबरम यांनी या मुद्द्यावरुन शरद पवार आणि शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे. चिदंबरम म्हणाले की, यूपीएचे अध्यक्षपद म्हणजे पंतप्रधान पद नाही. मला वाटत नाही की, शरद पवारांना यूपीएच्या अध्यक्षपदी येण्यास रस असेल. तसेही काँग्रेस यूपीएमधील सर्वात मोठा पक्ष आहे, त्यामुळे याचा अध्यक्षही काँग्रेसमधील असेल.
पवार स्वतः अध्यक्ष बनू इच्छित नाही
वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत चिदंरबरम म्हणाले की, 'मला वाटत नाही की, पवार यूपीएच्या अध्यक्षपदी येऊ इच्छितात. जेव्हा यूपीएची बैठक होते, तेव्हा सर्वात मोठा पक्षच अध्यक्षपद भूषवतो. यूपीएचे अध्यक्षपद म्हणजे एखादी वस्तू नाही, की कोणीही यावे आणि आपला हक्का सांगावा.'
काँग्रेसमधील व्यक्तीच यूपीएच्या अध्यक्षपदी असेल
चिदंबरम पुढे म्हणाले की, 'यूपीएची बैठक बोलवणे गरजेची आहे. जर बैठक बोलवली, तर स्वाभाविकच आमच्या पक्षाचा व्यक्तीच याचे अध्यक्षपद भूषवेल.सध्या यूपीएतील सर्व पक्षांनी एकमेकांना मदत करणे गरजेचे आहे. '
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.