आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Chief Minister Absent Before ED Despite Summons Why Send Summons, Arrest Me If There Is A Crime: Soren's Challenge

समन्स बजावूनही झारखंडचे मुख्यमंत्री ईडीसमोर गैरहजर:समन्स काय पाठवता, गुन्हा असेल तर मला अटक करा : सोरेन यांचे आव्हान

रांचीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अवैध उत्खनन व मनी लाँड्रिंग प्रकरणात समन्स बजावूनही झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन ईडीसमोर हजर झाले नाहीत. नंतर बोलताना सोरेन यांनी केंद्र व ईडीलाच आव्हान दिले. समन्स पाठवता, चौकशीसाठी कशाला बोलावता? मी गुन्हा केला असेल तर अटक करून दाखवा, असे ते म्हणाले. अर्थात नंतर त्यांनी ईडीला पत्र पाठवून तीन आठवड्यांचा अवधी मागितला.

भ्रष्टाचाऱ्यांना अभय नको, तपास संस्थांवर दबाव असू नये : मोदी नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘भ्रष्टाचारी लोकांवर कारवाई करताना दक्षता आयोगासारख्या संस्थांनी दबाव घेण्याची गरज नाही. देशाच्या हितासाठी कार्य करणाऱ्यांनी ही मानसिकता बाळगण्याची गरज नाही.’ सतर्कता जागृती सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात मोदी बोलत होते. ते म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत भ्रष्टाचाऱ्यांना अभय मिळायला नको.

आमदार खरेदीचे पुरावे दिले : केसीआर हैदराबाद | तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आमदार खरेदीवरून केंद्राला लक्ष्य केले. ते म्हणाले, लोकशाहीची हत्या करून, राज्य सरकारे पाडून, लोकांत भय निर्माण करून काय होईल? मी आमचे आमदार खरेदीचा कसा प्रयत्न झाला याचे पुरावे सरन्यायाधीशांपासून सर्वांकडे दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...