आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या कार्यकाळाला साडेचार वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कामाचे प्रगती पुस्तक सादर केले. या आधारावर, २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत पक्ष मते मागेल. भाजपचे राज्य प्रभारी राधामोहन सिंग, प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह हेही मंत्रिमंडळासह हे प्रगती पुस्तक सादर करताना उपस्थित होते. योगी म्हणाले की, राज्यातील जनता, संघटना आणि सरकारच्या एकत्रित प्रयत्नांमुळे राष्ट्रीय मंचावर राज्याची प्रतिमा बदलली आहे.
याेगी म्हणाले की, जनतेचा सरकारच्या कारभारावरील विश्वास वाढला आहे आणि आता हा विश्वास पुन्हा एकदा २०२२ च्या निवडणुकीत ३५० जागांच्या प्रचंड बहुमताने आपला विजय निश्चित करेल. साडेचार वर्षांत राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आणि सकारात्मक कार्यात सहकार्यासाठी २४ कोटी जनतेचे आभार मानले.
सपा : सरकार निरोपाचा आनंद साजरा करतेय
सपा अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले, अहंकारी सरकार सहा महिन्यांचे पाहुणे आहे. शेतकरी, गरीब, तरुण व महिलांवर अत्याचार झाले. बेरोजगारी आणि महागाई वाढली आहे.
काँग्रेस : फक्त खाेटे, खाेटे आणि खाेटेच सांगितले
काँग्रेसच्या सरचिटणीस आणि उत्तर प्रदेश प्रभारी प्रियंका गांधी म्हणाल्या की, सरकारने लोकांच्या प्रश्नाला उत्तर दिले नाही. खोटे, खोटे आणि फक्त खोटे सांगितले जाते. सरकार नोकऱ्या देण्यात, शेतकऱ्याला भाव देण्यात अपयशी ठरले.
बसपा: दाव्यांचे हवेत बाण, दुर्दशा जगजाहीर आहे
बसपा अध्यक्षा मायावती म्हणाल्या की साडेचार वर्षांच्या बदलाचे दावे मुख्यतः वाऱ्यावर उडणारे आहेत. सरकारचे शब्द आणि कृती यांच्यातील फरकामुळे गरिबी, बेरोजगारी वाढत आहे.
पूर्वी मुख्यमंत्र्यांमध्ये बंगले बांधण्याची स्पर्धा असायची, आम्ही गरिबांसाठी ४२ लाख घरे बांधली : याेगी याेगी म्हणाले की, हे तेच उत्तर प्रदेश आहे, जिथे गुन्हेगार आणि माफिया सत्तेचे शिष्य बनून २०१७ पूर्वी राज्यात भीती, भ्रष्टाचार आणि अराजकाचे वातावरण निर्माण करत होते. दर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी सामुदायिक दंगली होत असत, पण आज त्यांच्यावर होत असलेल्या कारवाईने संपूर्ण देशाला एक आदर्श घालून दिला आहे. पूर्वी मुख्यमंत्र्यांमध्ये बंगले बांधण्याची स्पर्धा असायची, पण या नव्या भारताच्या नवीन उत्तर प्रदेशात आम्ही ४२ लाख गरीब लोकांसाठी घरे बांधली. देशातील सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असण्याचा दंश सहन करणारे हे राज्य आज दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.