आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदिपुरुषवर संतापले अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य पुजारी:म्हणाले- भगवान राम-रावण चुकीचे दाखवले, चित्रपटावर बंदीची केली मागणी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रभासचा आदिपुरुष हा चित्रपट टीझर रिलीज झाल्यापासूनच वादात सापडला आहे. या चित्रपटाच्या टीझरवरून सोशल मीडियावर जोरदार वाद सुरू आहे. आता अलीकडेच अयोध्येतील राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यानेही आदिपुरुषांवर नाराजी व्यक्त करत या चित्रपटावर तातडीने बंदी घालण्याची मागणी केली आहे.

चित्रपटावर बंदी घालण्याची का केली मागणी?

राम मंदिराचे मुख्य पुजारी सतेंद्र दास यांनी मीडियाशी संवाद साधताना निर्मात्यांवर भगवान राम, रावण आणि हनुमान यांना चित्रपटात चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा आरोप केला आहे. ई-टाइम्सशी संवाद साधताना मुख्य पुजारी म्हणाले – ‘आदिपुरुषमध्ये रावणाचे ज्या प्रकारे चित्रण करण्यात आले आहे ते पूर्णपणे चुकीचे आणि निषेधार्ह आहे. या चित्रपटावर तातडीने बंदी घालण्याची आमची मागणी आहे.

आदिपुरुष हे रामायणाचे रूपांतर आहे. ओम राऊत यांनी रामायणातील व्यक्तिरेखा चुकीच्या पद्धतीने साकारल्या असून त्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.'

भाजप खासदारांनी केला चित्रपटाला विरोध

भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह म्हणाले- मला वाटते की, चित्रपटात मुद्दाम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चित्रपट बनवणे हा गुन्हा नाही, पण प्रसिद्धीसाठी वाद घालू नयेत.

अयोध्येतील साधू-संतांनी केला विरोध

आदिपुरुष चित्रपटातील पात्रे आणि त्यांनी परिधान केलेल्या वस्त्रांना अयोध्येतील संतांनी विरोध केला आहे. श्री राम वल्लभ कुंजचे प्रमुख आणि विक्रमादित्य महोत्सव समितीचे अध्यक्ष स्वामी राजकुमार यांनी हा सनातन धर्मावरील हल्ला असल्याचे म्हटले आहे.

सनातन धर्म आणि संस्कृतीशी छेडछाड कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही, असे ते म्हणाले.

साक्षी महाराज यांनी व्यक्त केली चित्रपटावर नाराजी

उन्नावचे भाजप खासदार साक्षी महाराज यांनी आदिपुरुष चित्रपटाला विरोध केला. साक्षी महाराज म्हणाले, चित्रपटात भारतीय संस्कृतीची खिल्ली उडवण्यात आली आहे. रावणाची भूमिका करणाऱ्याला दुसऱ्या रुपात खिलजीच्या रुपात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

हे अत्यंत निंदनीय आहे. त्याचा मी निषेध करतो. या चित्रपटाला समाज सुद्धा निषेध करेल असा माझा प्रयत्न राहील. त्यांच्या चित्रपटांवर आम्ही बहिष्कार घालणार.

चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार

ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष पुढील वर्षी 12 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. हा एक संपूर्ण भारतातील चित्रपट आहे, जो हिंदीसह तेलुगु, तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ओम राऊतबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी तान्हाजी आणि सिटी ऑफ गोल्ड या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...