आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Six Year Old Tanmay Sahu Falls Into Borewell In Betul; Rescue Operations LIVE Update | Madhya Pradesh Betul Mandvi News

बोअरवेलमध्ये 38 तासांपासून अडकला 6 वर्षांचा चिमुकला:तन्मयला बाहेर काढण्यासाठी 50 फूट खड्डा खोदला

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य प्रदेशातील बैतुल येथील मांडवी गावात 6 वर्षीय तन्मय बोअरवेलमध्ये पडून 38 तासांहून अधिक काळ लोटला आहे. बोअरला समांतर खड्डा खोदण्याचे काम सुरू आहे. मात्र सतत पाणी शिरल्याने खड्ड्याची खोली फारशी वाढू शकली नाही. आतापर्यंत बोअरला समांतर 50 फूट खोल खड्डा खोदण्यात आला आहे.

38 फूट खोल असलेल्या बोअरमध्ये चिमुकला अडकला आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ, होमगार्ड आणि स्थानिक प्रशासनाचे पथक बचावकार्यात शर्थीचे प्रयत्न करत आहेत. सुखरूप बाहेर निघावा यासाठी लोकांकडून प्रार्थना केली जात आहे. तन्मयसोबत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी मांडवी येथील गायत्री मंदिरात गायत्री मंत्राचा जप केला.

खड्ड्यात वारंवार पाणी भरत असल्याने कामावर परिणाम होत असल्याचे बचाव कार्यावर देखरेख ठेवणारे एडीएम श्यामेंद्र जैस्वाल यांनी सांगितले. दगड आणि खडक असल्याने उत्खननात तितकीशी प्रगती होत नाही. होमगार्ड कमांडंट एसआर अजमी यांनी सांगितले की, मुलापर्यंत पोहोचण्यासाठी 7 ते 8 फूट सरळ बोगदा तयार करण्यात येणार आहे. बोगदा तयार केल्यानंतर, मुलाला पायाच्या बाजूने बाहेर काढले जाईल. एनडीआरएफची टीम बचावकार्य करत आहे. बोगदा बनवण्याबाबत ब्लास्टिंग तज्ज्ञांशी चर्चा झाली आहे.

6 वर्षीय तन्मय दुसऱ्या वर्गात आहे. खेळत असताना सुमारे 400 फूट खोल बोअरवेलच्या खड्ड्यात पडला.
6 वर्षीय तन्मय दुसऱ्या वर्गात आहे. खेळत असताना सुमारे 400 फूट खोल बोअरवेलच्या खड्ड्यात पडला.

एडीएम म्हणाले - शेतमालकावर एफआयआर दाखल
एडीएम श्यामेंद्र जैस्वाल म्हणाले की, बाळाला सुखरूप बाहेर काढणे ही प्राथमिकता आहे. यानंतर शेतमालकावर एफआयआर दाखल करण्यात येईल. SDAF आणि NDRF टीम सतत मुलापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. खोदलेल्या खड्ड्यात खूप कठीण दगड येत असल्याने ते काढण्यात अडचण येत आहे. मंगळवारी संध्याकाळपासून मुलाने प्रतिसाद दिला नाही.

या संपूर्ण प्रकरणावर स्वत: लक्ष ठेवणारे सीएम शिवराज म्हणाले की, प्रशासनाला सर्व आवश्यक पावले उचलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बुधवारी अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की NDRF-SDERF ची टीम सतत काम करत आहे.

पाणी गळतीमुळे बोगदा बनवताना अधिक खबरदारी घ्यावी लागणार असल्याचे बचावकार्यात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यासाठी यंत्रसामग्री वापरली जाणार नाही. या कामासाठी अनुभवी लोकांची टीम तयार करण्यात आली आहे. लाइट ड्रिल मशिनच्या सहाय्याने बोगदा काढण्याचे काम हे पथक करणार आहे. जमिनीतून सतत पाणी झिरपत आहे. अशा स्थितीत दोन पंपांच्या सहाय्याने पाणी बाहेर काढण्याचे कामही केले जात आहे.

बचाव पथकाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, मूल कोणत्याही प्रकारे हलत नसून आम्ही शक्य तितक्या लवकर मुलापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. मुलाचे हात वरच्या बाजूला आहेत. यामुळे त्याला खाण्यापिण्याच्या कोणत्याही वस्तू पाठवू शकत नाही. बोअरवेलमध्ये ऑक्सिजन दिला जात आहे. काल, मंगळवारी संध्याकाळी 5 च्या सुमारास मुलाशी शेवटचे बोलणे झाले. तेव्हा तो म्हणाला होता, इथे खूप अंधार आहे. मला भीती वाटते आहे, लवकर बाहेर पडा.

बोअरवेलजवळ 36 फूट खोल खड्डा खोदण्यात आला. त्यातून पाणी बाहेर येत आहे. मोटारीतून पाणी काढले जात आहे. त्यानंतर बोगद्याचे काम केले जाणार आहे.
बोअरवेलजवळ 36 फूट खोल खड्डा खोदण्यात आला. त्यातून पाणी बाहेर येत आहे. मोटारीतून पाणी काढले जात आहे. त्यानंतर बोगद्याचे काम केले जाणार आहे.

चूक करणाऱ्यांवर कडक कारवाई
तन्मयला सुखरूप बाहेर काढणे हे पहिले प्राधान्य असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास सारंग यांनी सांगितले. मूल पडल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. ज्याची चूक उघडकीस येईल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. आम्ही प्रशासनाच्या सतत संपर्कात आहोत. या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री स्वतः लक्ष ठेवून आहेत.

6 पोकलेन, 3 बुलडोझर खोदण्याच्या कामात
जिल्हाधिकारी, एसपी यांच्यासह सर्व अधिकारी घटनास्थळी पोहोचले. 6 पोकलेन, 3 बुलडोझर आणि ट्रॅक्टर माती-मुरूम काढत आहेत. बचाव पथकाने सांगितले की, मूल 38 फूट खोल बोअरमध्ये अडकले आहे. त्यावर पाण्याचे थेंब टपकत आहेत. दगडामुळे खोदाईचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे.

जिल्हाधिकारी अमनबीर बैंस यांनी सांगितले की, मुलाला हातात दोरी बांधूनवर खेचण्याचा प्रयत्न करण्यात आला, तो 12 फूट वरही आला होता, पण त्याच दरम्यान दोरी सुटली आणि तो तिथेच अडकला.

तन्मयसोबत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी मांडवी येथील गायत्री मंदिरात गायत्री मंत्राचा जप केला.
तन्मयसोबत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी मांडवी येथील गायत्री मंदिरात गायत्री मंत्राचा जप केला.

खेळत असताना अचानक पडला

मांडवी गावात मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, तन्मय मैदानात खेळत होता. याच दरम्यान त्याने बोअरवेलमध्ये डोकावण्याचा प्रयत्न केला असता तोल गेल्याने तो त्यात पडला. मूल न दिसल्याने सर्वजण बोअरवेलच्या दिशेने धावले. बोअरवेलच्या आतून मुलाचा आवाज आला. यावर कुटुंबीयांनी तत्काळ बैतूल व आठनेर पोलिसांना माहिती दिली.

बचावकार्य सुरू झाल्यानंतर, प्रथम मुलासाठी बोअरवेलमध्ये ऑक्सिजन पाईप टाकण्यात आला. त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरा बोअरवेलमध्ये सोडण्यात आला. SDERF च्या टीम घटनास्थळी हजर झाल्या आणि मुलाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले.

वडिलांकडून मुलाला धीर देण्याचा प्रयत्न

घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी, डीआयजी, एसपी, आयुक्त श्रीमान शुक्ला, तहसीलदार आठनर यांच्यासह पोलिस-प्रशासनाचे सर्व बडे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कुटुंबीयांना मुलाशी बोलण्यास सांगितले होते. वडीलांनी मुलाशी त्याला बोलून धीर देण्याचा प्रयत्न केला. यावेळी 'इथे खूप अंधार आहे. मला भीती वाटते. लवकर बाहेर काढा', असे चिमुकला म्हणाला. तन्मय इयत्ता दुसरीत शिकतो. वडील सुनील दियाबर यांनी सांगितले की, त्यांनी 8 दिवसांपूर्वी शेतात 400 फूट खोल बोअर केला होता. त्यांचा मुलगा याच बोअरवेलमध्ये पडला.

गुजरातमध्ये शिवम 300 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला

गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यात शिवम हा दीड वर्षाचा मुलगा बोअरवेलमध्ये पडला. ही घटना ध्रांगध्रा तालुक्यातील दुदापूर गावातील शेतात घडली आहे. खेळता खेळता शिवम 300 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला. त्यावेळी त्याचे आई-वडील शेतात काम करत होते, मुलगा दिसत नसल्याने त्यांनी धाव घेतली. आजूबाजूला पाहिले असता बोअरवेलमधून मुलाच्या रडण्याचा आवाज येत होता. त्यांनी गावकऱ्यांना बोलावले. ग्रामस्थांनी पोलिस व प्रशासनाला घटनेची माहिती दिली. सुमारे 40 मिनिटांत सैनिकांनी त्या मुलाला बोअरवेलमधून बाहेर काढले. रात्री 10.45 वाजता मुलाला बोअरवेलमधून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर रुग्णवाहिकेत नेऊन त्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

बातम्या आणखी आहेत...