आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Children Being Tortured, Over 92,000 Calls Are Being Made For The Complaints Of Atrocity; All Calls Are Between 20 31 March

लॉकडाऊनचे दुष्परिणाम:मुलांवर होत आहेत अत्याचार, तक्रारींचे तब्बल 92 हजार कॉल; सर्व कॉल 20-31 मार्च दरम्यानचे 

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • देशव्यापी बंदनंतर घरगुती हिंसाचाराच्या तक्रारीदेखील वाढल्या आहेत

लॉकडाऊनदरम्यान चाइल्डलाइन इंडिया हेल्पलाइन क्रमांकावर मुलांविरोधातील हिंसा आणि त्यांच्यावर अत्याचार झाल्याच्या तक्रारींचे ९२ हजार १०५ कॉल आले आहेत. चाइल्डलाइन इंडियाच्या उपसंचालक हरलीन वालिया यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, हे कॉल २०-३१ मार्च दरम्यान ‘चाइल्डलाइन १०९८’ वर आले. २५ मार्चपासून लाॅकडाऊन सुरू झाल्यानंतर ५० टक्के कॉल वाढले आहेत. मंगळवारी जिल्ह्यांमधील बालक बचाव शाखांच्या कार्यशाळेत ही माहिती देण्यात आली. या कार्यशाळेत महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भाग घेतला. कोरोनाशी संबंधित मुद्दे आणि बंद काळात मुलांमधील तणाव दूर करण्याचे उपाय शोधण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. वालिया यांनी सांगितले की, चाइल्डलाइनला लॉकडाऊनच्या काळात शारीरिक आरोग्याबाबत ११ टक्के, बाल मजुरीबाबत ८ टक्के, बेपत्ता व घरातून मुले पळून गेल्या संदर्भात ८ टक्के आणि बेघर मुलांबाबत ५ टक्के कॉल आले. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी नुकतेच म्हटले होते की, देशव्यापी बंदनंतर घरगुती हिंसाचाराच्या तक्रारी वाढल्या आहेत. ईमेलवरूनच ६९ तक्रारी आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...