आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Children Coronavirus Treatment Guidelines: Baccho Mein Corona Ke Lakshan | Managing Kids With Asymptomatic Covid 19 At Home

आरोग्य मंत्रालयाकडून गाइडलाइन्स जारी:मुलांना कोरोना झाल्यावर घरी उपचार शक्य, जाणून घ्या मुलांची देखभाल कशी करावी

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काही मुलांमध्ये मल्टी-सिस्टीम इन्फ्लेमेट्री सिंड्रोम

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांना मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग होत आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, अनेक मुलांचा उपचार घरात राहून करता येईल. मंत्रालयाने मुलांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांची देखभाल करण्याबाबत गाइडलाइन्स जारी केल्या आहेत.

आरोग्य मंत्रालयाने एका ट्वीटमध्ये म्हटले की " कोरोना संसर्ग झालेल्या बहुतेक मुलांमध्ये कोणेतेही लक्षण नाही, किंवा एकदम हलके लक्षण आढळून येत आहेत.''

Asymptomatic म्हणजेच लक्षण नसलेल्या मुलांची देखभाल

आरोग्य मंत्रालयाने सांगितल्यानुसार, लक्षण नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह मुलांची घरातच देखभाल करता येते. कोरोना झालेल्या मुलांमध्ये काही दिवसानंतर घशात खवखव, सर्दी आणि खोकल्यासारखे लक्षण दिसू शकतात. काही मुलांमध्ये पोटदुखीची समस्यादेखील येऊ शकते. या मुलांना घरातच आयसोलेट करुन लक्षणांच्या आधारे उपचार केला जाऊ शकतो.

लक्षण नसलेल्या मुलांच्या ऑक्सिजन लेव्हलवर ऑक्सीमीटरने सतत लक्ष असू द्या. जर ऑक्सिजन लेव्हल 94% पेक्षा कमी झाली, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. Congenital heart disease(जन्मापासून ह्रदयाचा आजार) chronic lung disease(अनेक वर्षांपासून फुफ्फुसाचा आजार), chronic organ dysfunction(एखादा अवयव काम न करणे किंवा वजन जास्त असणे) अशा मुलांवर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच घरी उपचार करा.

काही मुलांमध्ये मल्टी-सिस्टीम इन्फ्लेमेट्री सिंड्रोम (MIS-C)

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितल्यानुसार, कोरोनाची लागण झालेल्या काही मुलांमध्ये मल्टी-सिस्टीम इन्फ्लेमेट्री सिंड्रोम (MIS-C) नावाचा नवीन सिंड्रोम पाहण्यात येत आहे. अशा मुलांना सतत 38 डिग्री सेल्सियस म्हणजेच 100.4 ड्रिग्री फेरनहाइटपेक्षा जास्त ताप असते. अशा काही प्रकरणांमध्ये डॉक्टरांच्या उपचाराची गरज भासते.

बातम्या आणखी आहेत...