आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या चर्चा सुरू असतानाच आता किशोरवयीनांचे लसीकरण सुरू होणे जवळपास निश्चित झाले आहे. सर्व काही सुरळीत राहिल्यास ऑक्टोबरपासून 12 ते 18 वर्षे वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण सुरू होणार आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने सूत्रांचा दाखला देत ही माहिती दिली. त्यानुसार, कॅडिला हेल्थकेअर पुढच्या महिन्यात लहान मुलांचे झायकोव्ह-डी कोरोना व्हॅक्सीन लाँच करत आहे.
विशेष म्हणजे, या लसीच्या आपातकालीन वापरासाठी भारताच्या DGCI अर्थात भारतीय औषध महानियंत्रकांनी गेल्या महिन्यातच मंजुरी दिली होती. वृत्तसंस्थेच्या माहितीप्रमाणे, झायडस ऑक्टोबरपासून दरमहा 1 कोटी लसींचे उत्पादन करणार आहे.
कोव्हॅक्सीनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण
तर दुसरीकडे भारत बायोटेकचे स्वदेशी व्हॅक्सीन कोव्हॅक्सिनच्या लहान मुलांवर होत असलेल्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण झाल्या. कंपनीने सांगितल्याप्रमाणे, सध्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीच्या आकडेवारींची चाचपणी सुरू आहे. पुढच्या आठवडाभरात चाचणीची माहिती DGCI ला सोपविली जाईल. तर सिरम इंस्टिट्युट ऑफ इंडियाने सुद्धा 2 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोवाव्हॅक्सच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू केल्या आहेत.
गंभीर आजारी मुलांना प्राधान्य
कोविड-19 व्हॅक्सीनेशन मुलांना देत असताना गंभीर आजार असलेल्या आणि 12 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांना लस देण्याचा सल्ला सरकारी समितीने दिला होता. समितीच्या मते, देशात 40 कोटी लहानगे आहेत. तसेच सर्वांना डोस देण्यास सुरुवात केली जाऊ शकते. पण, असे केल्यास सध्या सुरू असलेल्या 18+ व्हॅक्सीनेशन प्रक्रियेवर प्रभाव पडू शकतो. समितीचे अध्यक्ष एनके अरोरा यांच्या मते, पूर्णपणे निरोगी लहानग्यांना व्हॅक्सीनसाठी वाट पाहावी लागणार आहे. ज्या मुलांनी किडनी ट्रांसप्लांट केली असेल किंवा जन्मतः कर्करोग किंवा हृदयाशी संबंधित आजार असतील त्यांना प्राधान्य दिले जाईल.
लहानग्यांचे लसीकरण आवश्यक का?
सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांपैकी एक भारतात लहानग्यांसह सर्वांचे लसीकरण आवश्यक आहे. हे समजून घेण्यासाठी महाराष्ट्राचे उदाहरण घेता येईल. मुंबईत कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये संक्रमण अधिक होते. मायक्रोबायोलॉजिस्ट प्राध्यापक डॉ. गगनदीप कंग यांच्या मते, मोठ्यांना लस दिल्यानंतर छोटेच असुरक्षित राहतील. त्यामुळे, तिसऱ्या लाटेत लहानग्यांमध्ये कोरोना संक्रमण अधिक राहण्याची भीती आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.