आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाल संरक्षण प्रकरण:आजी-आजोबा नाही तर मुलांनी आई-वडिलांसोबत राहणे गरजेचे : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली / पवन कुमार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका मुलाने आजी-आजोबांसोबत राहण्याऐवजी त्याच्या आई-वडिलांसोबत राहणे जास्त आवश्यक आहे. मुलाला आई-वडिलांकडून बरेच काही शिकण्यास मिळते, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने मंगळवारी ७ वर्षांच्या मुलाचा ताबाप्रकरणी सुनावणी करताना म्हटले. त्यांनी मुलाशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. मुलाच्या ताब्याबाबत अलिप्त राहणाऱ्या नवरा-बायकोचा खटला न्यायालयात दाखल आहे. सध्या मुलगा आजी आणि आजोबांसोबत राहत आहे.

न्यायाधीश चंद्रचूड यांनी प्रकरणाची सुनावणी सुरू करताना म्हटले की, मुलांना आजी-आजोबांवर लादणे मला अजिबात आवडत नाही. आजी-आजोबांना स्वत:हून वाटेल तेव्हाच त्यांनी मुलांसोबत राहायला हवे. मुलाची देखभाल करायची आहे म्हणून त्यांनी त्याच्यासोबत राहायला नको. मुलांचे आई आणि वडिलांसोबत राहणे जास्त आवश्यक असते. मुलाच्या वडिलांनी पत्नीला घरी घेऊन जाण्यास तयार असल्याचा युक्तिवाद नेहमीच केला आहे. यामुळे मुलाला आई आणि वडील दोघांचेही प्रेम मिळेल, असे त्यांचे म्हणणे आहे. यावर न्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, यासाठी पत्नीही तुमच्यासोबत राहण्यासाठी तयार असणे अत्यंत गरजेचे आहे.