आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Children Who Have Forgotten The Way Of School Are Most Afraid Of Socializing, Parents Should Talk To Children In This Way To Remove Anxiety; News And Live Updates

पुन्हा शाळेत जाण्याची भीती:शालेय पद्धती विसरलेल्या मुलांना समाजकारणाची सर्वात जास्त भीती; मुलांची चिंता दूर करण्यासाठी पालकांनी अशाप्रकारे करावे संवाद

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • पालकांनी टिप्सचा करा वापर

लॉकडाऊनमुळे गेल्या अनेक दिवसापासून बंद असलेल्या शाळा हळूहळू उघडत आहे. त्यामुळे घरात कित्येक दिवसापासून बंद असलेल्या मुलांनी शाळेत जाण्यास सुरुवात केली. तर इतर मुलं काही दिवसांनी शाळेत जाणार आहे. काही मुलासांठी ही आनंदाची बाबत आहे तर काही मुलांमध्ये याचे उलटे परिणाम पाहायला मिळत आहे. घरात अनेक दिवसांपासून बंद असलेली मुले शाळेत जाण्याबाबत चिंतीत आहेत. त्यामुळे मुलांवर याचे वेगळे परिणाम होत आहे. चला तर मग जाणून घेऊया की, मुलांमधील ही चिंता कशी दूर करायची. त्यासाठी पालकांनी कोणत्या टिप्सचा वापर करावा हे सर्व जाणून घेणार आहोत.

कंसल्टेंट सायकोलॉजिस्ट डॉ. प्रज्ञा रश्मी सांगतात की, सुमारे दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने मुले घरीच असून मुलांना सर्वात जास्त काळजी समाजकारणाची वाटत आहे. मुलं अनेक दिवसापासून घरात बदं असल्याने त्या आपले जूने रुटीन विसरले आहे. अशा परिस्थितीत शिक्षक त्यांना समजून घेतील की नाही? पुन्हा शिक्षकांचे ते आवडते बनू शकतील का? असे अनेक प्रश्न मुलांच्या मनात निर्माण होत असल्याचे डॉ रश्मी यांनी सांगितले.

 • मला माझ्या वर्गातील सीट आठवत नाही, म्हणून शिक्षक मला यासाठी शिक्षा देतील का?
 • जुने वर्गशिक्षक बदलेले असल्याने आता नवीन शिक्षक आले आहेत. त्यांना फक्त ऑनलाईन पाहिले असून त्यांची आतापर्यंत कधी भेट झाली नाही. त्यामुळे ते आपल्याला समजून घेतील का?
 • ऑनलाईन क्लासेसपूर्वी सारखे शिक्षक माझ्या वागण्याने किंवा शाळेतील माझ्या ज्ञानामुळे आनंदी होतील का? असे अनेक प्रश्न सध्या विद्यार्थ्यांना भेडसावत आहेत.
मुलांना समजून घेण्यासाठी वेळ द्या.
मुलांना समजून घेण्यासाठी वेळ द्या.

पालकांनी टिप्सचा करा वापर
1) शाळेत जाण्याबाबत मुलांच्या मनात काय विचार येत आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा.
2) मुलांसमोर शाळा आणि शिक्षकांबाबत कोणतीही नकारात्मक गोष्ट करु नका.
3) मुलांना वेळ द्या आणि आपण त्यांना समजून घेतोयं असं जाणवू द्या.
4) मुलांना परत जून्या रुटीनमध्ये येण्यासाठी मदत करा.

मुले जूने रुटीन विसरल्याने परत येण्यासाठी त्यांना वेळ लागणार आहे.
मुले जूने रुटीन विसरल्याने परत येण्यासाठी त्यांना वेळ लागणार आहे.

मुलं काय विचार करत आहेत? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा.
डॉ. प्रज्ञा सांगतात की, आपल्याला मुलाला शाळेत परत जाण्याबद्दल काय वाटते हे विचारा. यामध्ये डोकेदुखी, पोटदुखी, झोपेच्या समस्या, सतत "काय होईल" हा प्रश्न, चिडचिडेपणा, शालेय कामावर लक्ष केंद्रित करण्यात समस्या आदी बाबींबर लक्ष ठेवायला हवे. त्यासोबतच सतत समजावल्यानंतर ही मुलं चिंतेत असतील तर त्यांच्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

 • पालकांनी मुलांना हे सांगायला हवं की, हे कठीण असू शकते, कारण त्यांना आता घरी अभ्यास करण्याची सवय झाली आहे. बर्‍याच गोष्टी असतील ज्या मुलांना माहित नसतील, परंतु त्यांना ते सर्व पुन्हा करावे लागणार आहे याची खात्री करुन द्या.
 • 'तुम्ही हे करू शकता', असं पालकांनी मुलांना सतत सांगायला हवं. जगात अशक्य असं काही नाहीये.
 • मुलांना हे सांगा की, कोणतेही काम करण्यापूर्वी मोठ-मोठ्या व्यक्तींही चिंताग्रस्त असतात. त्यामुळे जेंव्हा असं वाटेल तेंव्हा एक दीर्घ श्वास घ्या आणि मन शांत करा.
बातम्या आणखी आहेत...