आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Children's Lives, All This Heartbreaking: Court, Comment On Children Who Lost Their Parents In Corona

नवी दिल्ली:मुलांचे आयुष्य पणाला, हे सर्व हृदयद्रावक : कोर्ट, कोरोनात पालक गमावलेल्या मुलांवर टिप्पणी

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना महामारीत आई-वडील किंवा एक पालक गमावलेल्या मुलांवर सर्वोच्च न्यायालयाने मार्मिक टिप्पणी केली आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, ‘महामारीदरम्यान आई-वडील किंवा त्यापैकी एकाला गमावलेल्या मुलांचे आयुष्य पणाला लागले आहे, हे हृदयद्रावक आहे.’ तथापि, अशा मुलांची देखभाल व शिक्षण यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी जाहीर केलेल्या योजनांवर न्यायालयाने समाधान व्यक्त केले. कोरोनाकाळात अनाथ मुलांच्या देखभालीच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्ट स्वत: दखल घेऊन सुनावणी करत आहे.

न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव व अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठाने २६ ऑगस्टला जारी आदेशात म्हटले की, ‘भारत सरकार, राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांनी गरजू मुलांच्या देखभालीची आणि त्यांच्या भविष्याबाबतच्या योजनांची घोषणा केली आहे, याचे आम्हाला समाधान वाटत आहे. संबंधित अधिकारी अशा मुलांच्या पायाभूत गरजा पूर्ण करण्यात कोणतीही कसर सोडणार नाहीत, याबाबत आमच्या मनात कुठलाही संशय नाही.’

बातम्या आणखी आहेत...