आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचिनी लष्कराने मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही पूर्व लडाखमधील हॉट स्प्रिंग्स आणि गोग्रातून आपले सैनिक व तात्पुरते बांधकाम हटवले. सूत्रांनी सांंगितले की, चीनच्या मागे हटण्यावर भारतीय लष्कर नजर ठेवून आहे. हवाई दलानेही सोमवारी रात्री या भागात गस्त घातली.
दरम्यान, पूर्व लडाखमधून चीन आणि भारतीय लष्कर मागे घेण्याची प्रक्रिया दोन दिवसांत पूर्ण होईल. गोग्रा आणि हॉट स्प्रिंग्स हे संघर्षाचे केंद्रबिंदू आहेत जेथे भारत आणि चीनचे लष्कर मागील आठ आठवड्यांपासून समोरासमोर उभे ठाकले होते. लष्कर मागे हटण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली आहे. गलवान खोऱ्यात पेट्रोलिंग पाॅइंट १४ वरून चिनी सैनिक पूर्णपणे मागे हटले आहेत. तर, पँगोंग त्सो येथेही चिनी सैनिकांच्या संख्येत थोडी घट झाल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी सांगितले की, या दरम्यान कोणत्याही आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कर पूूर्णपणे सज्ज आहे. लष्कर मागे हटण्याचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर या आठवड्यात दोन्ही लष्करात पुन्हा एकदा बैठक होईल. ३० जूनच्या चर्चेत झालेल्या संमतीनुसार दोन्ही लष्कर आपापल्या भागात तीन किलोमीटरचा बफर झोन बनवतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.