आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • China Bans 232 Apps, Adds 300 New Ones; China Is Running The App Through The Proxy Of Hong Kong

चिनी अ‍ॅप:चीनच्या 232 अ‍ॅपवर बंदी, 300 नवे आले; हाँगकाँगचे सांगत प्रॉक्सीद्वारे अ‍ॅप चालवतोय चीन

जयपूर / मुकेश माथुरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चीनकडून आलेल्या एका धोक्याच्या कचाट्यात सर्वच आले आहेत. हे चिनी शस्त्र आहे डेटिंग, चॅटिंग, ट्रेडिंग व लोन अ‍ॅप. अ‍ॅप स्टोअरवर असे ३५ व गुगल प्लेवर २५० पेक्षा जास्त अ‍ॅप आहेत. सरकारने २०२० पासून आतापर्यंत २३२ चिनी अ‍ॅपवर बंदी घातली. मात्र, ३०० पेक्षा जास्त अ‍ॅप देशात पुन्हा अ‍ॅक्टिव्ह आहेत. ते हाँगकाँग, व्हिएतनाम, सिंगापूर, इंडोनेशियाचे असून चिनी कंपन्या प्रॉक्सी लोकेशनद्वारे चालवतात. तज्ज्ञांच्या मदतीने बनवलेला या अ‍ॅपचा गोपनीय अहवाल सरकारला पाठवला जाईल. हा अहवाल दिव्य मराठीकडे आहे.

हे अ‍ॅप ऑनलाइन वेश्या व्यवसायही करत असल्याचा दावा केला आहे. लहान शहरे-गावातील उच्चभ्रू कुटुंबातील मुली-महिला याच्या जाळ्यात अडकत आहेत. अ‍ॅपवर आल्यानंतर त्यांना बोलण्याची, भेटण्याची ऑफर मिळते. आयटी तज्ज्ञ नीलेश पुरोहित सांगतात, ‘मी एका अ‍ॅपवर मुलीशी बोललो. विचारले, किती कमावते? म्हणाली, खूप बोलण्याचे दरमहा ~३०-४० हजार. प्रत्येक स्टारचे ५०० रुपये. म्हणजे महिन्याला ~७०-८० हजार रुपये. काही शहरांत ब्रोकर पेमेंट देत असल्याचेही मुलीने सांगितले. मात्र, या अ‍ॅपमुळे कोट्यवधी उपकरणांचा डेटा चीनच्या सर्व्हर्समध्ये जमा होत आहे.’

लष्करातील लोकांनाही करत आहे टार्गेट, सरकारने हे थांबवायला हवे : मेजर जनरल (निवृत्त) अशोककुमार
भारतातील प्रत्येक नागरिक व लष्करातील लोकांना चीन टार्गेट करत आहे. तो सोशल मीडिया, इन्फर्मेशन वॉरफेअरसोबत हल्ला करू शकतो. प्रॉक्सी नाव, पत्त्याने चीन अनेक अ‍ॅप चालवत आहे. हे थांबवणे गरजेचे आहे. सरकारने ते ओळखून बंद करावे. सिक्युरिटी नेटवर्क मजबूत करावे लागेल.

पाच अ‍ॅपकडेच आहे १३.५ कोटी लोकांचा डेटा, प्रतिनिधीला दरमहा मिळतात ८०० डॉलर
सरकारने ५९ अ‍ॅपवर बंदी घातली तेव्हाच ब्यूटीप्लस व यूकॅम अ‍ॅपवरही बंदी घातली होती. मात्र, ते नव्या आयपी व प्रॉक्सी अ‍ॅड्रेसद्वारे पुन्हा सुरू केले आहेत. यूकॅन मेकअप अ‍ॅपही असेच आहे. डेटिंग अ‍ॅप वाका प्लेने केरळमध्ये छोटासा ऑफिस अ‍ॅड्रेस देऊन भारतात बँक खाते उघडले. मग तेथूनच संपूर्ण पैसा चीनला पाठवला जात आहे. हा धोका म्हणजे त्यांनी स्वत:चे डीडा-पे, गोल्ड-पे आदी नावांनी पेमेंट गेटवे बनवले. त्याद्वारे अब्जावधी रुपये बाहेर पाठवले जात आहेत. एका कंपनीच्या प्रतिनिधीने सांगितले की, कंपनी सिंगापूरची नव्हे तर चीनची आहे. यासाठी त्याला दरमहा ८०० डॉलर मिळतात. अ‍ॅप टोपण नावाने चालवतात. असाच एक अ‍ॅप बोलोजी प्रोवर २ कोटी लोकांचा डेटा, चमेटवर १ कोटी, वाका प्लेवर ५० लाख यूजर, ब्यूटीप्लसवर १ कोटी, तर यूकॅमवर १० कोटी यूजर्सचा डेटा आहे.