आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सीमा वाद:चर्चेच्या बहाण्याने पँगाँग जवळ चीन बनवतोय बराकी, पूर्व लडाख सीमेबाबत एकाच वेळी चर्चा आणि चालबाजी

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चीनच्या पँगाँग तलाव परिसरात नवीन बांधकामांनाही वेग

पूर्व लडाख सीमेवर भारत व चीन सैनिकांतील तणावाला चर्चेतून सोडवण्याचा बहाणा करत चीनने आणखी एक चालबाजी केल्याचे उघड झाले. चीन वास्तविक नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) ५ जी तंत्रज्ञानासाठी फायबर केबल अंथरण्याचे काम करत आहे. एवढेच नव्हे तर पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) पँगाँग तलावाजवळ सैनिकांसाठी बंकर तसेच इतर लष्करी निर्माण कार्य सुरू आहे.

गुप्तचर यंत्रणेने चीनच्या हालचालींची माहिती दिली आहे. चीनने ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात एलएसीचा वादग्रस्त भाग डेमचोकमध्ये ५ जी नेटवर्कच्या उभारणीसाठी काम सुरू केले आहे. एलएसीवर फायबर ऑप्टिकल केबल लावले जात आहे.

नव्या शेडच्या निर्मितीचे काम सुरू :
सीमेवरून मागे हटण्यास सांगण्यात आल्यापासून चीनच्या पँगाँग तलाव परिसरात नवीन बांधकामांनाही वेग आला आहे. नवे शेड तयार केले जात आहेत. दोन देश सीमाप्रश्नी लष्करी पातळीवर चर्चेसाठी परस्परांच्या संपर्कात आहेत. यादरम्यान चीनने सीमेजवळ लष्करी बांधकामाचे उद्योगही वाढवले. १५ जून रोजी गलवान खोऱ्यात दोन्ही देशांतील धुमश्चक्रीनंतर कूटनीती तसेच लष्करी पातळीवरील चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या.

फिंगर-५ ते फिंगर-८ पर्यंत चीनने ताकद वाढवली
भारत-चीन यांच्यात मेपासून तणावाला सुरुवात झाली होती. सुरुवातीला गलवान खोरे, पेट्रोलिंग पॉइंट-१५ पासून चीनने सैन्य माघारी घेण्याचा निर्णय घेतला होता. पँगाँग तलाव व गोगरा-हॉट स्प्रिंग (पीपी-१७ ए अशीही त्याची आेळख) बाबत चीन अजूनही अडेलतट्टूपणा दाखवत आहे. चिनी सैन्याने मेच्या सुरुवातीला फिंगर-४ पासून फिंगर-८ दरम्यान नाकेबंदी सुरू केली होती. तेव्हापासून चीन सीमेवर मे महिन्यापूर्वीची स्थिती बहाल करण्यास कुचराई करू लागला आहे.