आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. चीनमध्ये कोरोनाचा स्फोट पाहायला मिळतोय. त्यामुळे संपूर्ण जग पुन्हा एकदा हायअलर्टवर आहे. भारतातही विशेष काळजी घेतली जात आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी भारतात पुन्हा मास्क बंधनकारक करण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे म्हटले. पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
चीनच्या परिस्थितीवरून भारतात आधीच खबरदारी म्हणून उपाययोजना करण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कालच मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसूख मांडवीय यांनी आज कोरोना संदर्भात निर्णय घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत वरिष्ठ पातळीवर चर्चा होणार आहे. चीनमधील कोरोनाचा उद्रेक पाहता भारताची पुढची पावलं काय असतील, त्याची रूपरेषा काय असेल यासंदर्भात आज बैठकीत निर्णय घेतला जाईल.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार पत्रकार परिषदेमध्ये म्हणाल्या की, कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात आपल्यातील अनेकांना जीव गमवावा लागला होता. संपूर्ण देश ठप्प झाला होता. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी भारतात कोरोना लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. भारताने 220 कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला आहे. चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने इतर देशांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. परदेशातून येणाऱ्या लोकांमधून भारतात संसर्ग पसरणार नाही याकडे सरकारचं लक्ष असेल.
Omicron च्या BF.7 ने चीनमध्ये कहर
आरोग्य तज्ञांनी सांगितले की Omicron BF.7 उप-प्रकार चीनमध्ये सध्याच्या वाढीव प्रकरणांना जबाबदार आहे. पुढील तीन महिन्यांत तीन कोरोना लाटा येण्याचा धोका आहे. यामुळे 80 कोटी लोकांना संसर्ग होण्याची शक्यता असून 10 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांतील कोरोनाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर गेल्या आठवड्यात भारतात संसर्गामुळे 12 मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. मार्च 2020 नंतर रोजच्या मृत्यूच्या बाबतीत हे सर्वात कमी आहे. कोरोनाच्या रुग्णांबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या आठवड्यात कोरोनाचे 1103 नवीन रुग्ण आढळले आहेत.
खाटांविना रुग्णालये, औषधे संपताहेत
चीनने झीरो काेविड धोरणात सवलत दिली होती. यानंतर रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. स्थिती एवढी गंभीर झाली आहे की, रुग्णालयातील सर्व खाटा भरल्या आहेत. औषध नाही, जिथे कुठे असेल तिथे रांगा लावाव्या लागत आहेत. बीजिंमध्ये स्मशानभूमीत 24 तास अंत्यसंस्कार केले जात आहेत. येथील स्थिती एवढी वाईट की,अंत्यसंस्कारसाठी वेटिंग 2000 पर्यंत पोहोचले आहे. हेबेई राज्यातील एका अंत्यविधी केंद्रात काम करणारा तरुण म्हणाला की, येथे रोज 25 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केला जात आहे. डिसेंबरआधी ही संख्या केवळ 4 होती. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
एका रुग्णामुळे 18 लोक संक्रमित
चीनमधील कोरोना संसर्गाची परिस्थिती 2020 ची आठवण करून देत आहे. परिस्थिती इतकी बिकट आहे की, येथील रुग्णालयातील सर्व खाटा भरल्या आहेत. मेडिकल स्टोअर्समध्ये औषधे संपत आहेत. बीजिंगच्या सर्वात मोठ्या स्मशानभूमीत 24 तास अंत्यसंस्कार केले जातात. तज्ञांचे म्हणणे आहे, की याचे कारण चीनमध्ये पसरलेला कोरोनाचा नवीन व्हेरियंट असू शकतो. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.