आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • China Deploys Bomber Un Cruise Missile Near Doklam, Just 1,150 Km From Indian Border

नियंत्रण रेषेवर तणाव:चीनने डोकलामजवळ तैनात केले बॉम्बर अन् क्रूझ क्षेपणास्त्र, हा तळ भारतीय सीमेपासून फक्त 1,150 किमी दूर

बीजिंगएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) तणाव कमी करण्यासाठी लष्करी आणि राजनैतिक स्तरावर चर्चा सुरू असली तरी पाठीत सुरा खुपसण्याचा चीनचा पवित्रा अजूनही कायम आहे. त्या देशाने आता भारताच्या पूर्व भागात वादाचा नवीन मोर्चा उघडण्याची तयारी केली आहे. चीनने भूतान सीमेवरील डोकलामजवळ आपले एच-६ अणु बाॅम्बर आणि क्रूझ क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत. चीन या विनाशकारी शस्त्रास्त्रांची तैनाती आपल्या गोलमुड हवाई तळावर करत आहे.

हा तळ भारतीय सीमेपासून फक्त १,१५० किमी दूर आहे. त्याआधी चीनने या घातक बाॅम्बरची तैनाती अक्साई चीनच्या काशगर हवाई तळावर केली होती. ओपन सोर्स इंटेलिजन्स अॅनालिस्ट डेट्रेस्फातर्फे जारी उपग्रहाच्या छायाचित्रात या बाॅम्बरसोबत केडी-६३ लँड अटॅक क्रूझ क्षेपणास्त्रही दिसत आहे.