आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • China Deploys Nuclear Bombers Near India Border, Open Intelligence Source Detresfa Blasts Twitter

सीमावाद:चीनने भारताच्या सीमेजवळकेले अण्वस्त्रवाहू बॉम्बर तैनात, ओपन इंटेलिजन्स सोर्स डेट्रेसफाने ट्विटरवर केला गौप्यस्फोट

लडाख3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लडाखपासून चीनचा एअरबेस 600 किलोमीटर आहे लांब

भारतीय सीमारेषेजवळ चीनच्या कुरापती सुरूच आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) भारतीय सीमेजवळील काशगर विमानतळावर अण्वस्त्रांनी सुसज्ज अनेक बॉम्बर युद्धविमाने तैनात केली आहेत. उपग्रहांद्वारे टिपलेल्या छायाचित्रांनुसार ही माहिती मिळाली आहे.

मुक्त हेरगिरी स्रोत डेट्रेसफाने ट्विट करून उपग्रहांद्वारे टिपलेली छायाचित्रे जारी केली आहेत. त्यात काशगर एअरबेसवर चीनची बॉम्बर विमाने इतर अत्याधुनिक शस्त्रास्त्रेही तैनात असल्याचे दिसते. या बेसवर ६ शियान एच-६ बॉम्बर असून त्यातील दोन विमाने पेलोडसह सज्ज आहेत.

यासोबतच चीनच्या काशगर विमानतळावर १२ शियान जेएच-७ फायटर बॉम्बर असून त्यातील दोनवर पेलोडही आहे. तसेच ४ शेनयांग जे ११/१६ फायटर विमानेही येथे असून त्यांची क्षमता ३,५३० किलोमीटर आहे. या बॉम्बर विमानांत अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे.

११ तास चालली भारत-चीनमधील लष्करी पातळीवरील बैठक

रविवारी भारत व चीन यांच्यादरम्यान कोअर कमांडर स्तरावर पाचवी चर्चा एलएसीजवळ मॉल्डोमध्ये झाली. ही बैठक सुमारे ११ तास चालली. भारताने पँगाँग त्सोसह काही महत्त्वाच्या पॉइंट्सवरून चिनी सैनिकांनी माघार घ्यावी आणि ५ मेपूर्वीची स्थिती बहाल करावी या मागणीवर भर दिला. या चर्चेत भारताकडून लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंह हे तर चीनकडून मेजर जनरल लियू जिन सहभागी झाले. भारत व चीनमध्ये चौथ्या टप्प्यातील बैठक १४ जुलैला झाली होती. ती १५ तास चालली होती.

लडाखपासून चीनचा एअरबेस ६०० किलोमीटर आहे लांब

चीनचा काशगर एअरबेस लडाखच्या भारतीय बेसपासून ६०० किमी लांब आहे. चीनच्या एच-६ची रेंज तब्बल ६ हजार किलोमीटर आहे. चीनने एच-६ जे आणि एच-६ जी विमानांसह साऊथ चायना सीमध्ये लष्करी सराव केला आहे. तथापि, ही सज्जता नियमित सराव असल्याचे चीनच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. याद्वारे युद्धाच्या वेळी सज्ज राहण्याचा सराव केल्याचेही चीनने सांगितले.