आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • China Flag On Galwan Valley | Marathi News | Rahul Gandhi To Narendra Modi; Chinese Flag Rise Over India's Galwan Valley On New Year

ध्वजावरुन वाद:नववर्षाला चीनने भारताच्या हद्दीत नव्हे तर त्यांच्याच हद्दीत फडकावला चीनी ध्वज; भारतीय लष्कराच्या सुत्रांनी दिली माहिती

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नववर्षाच्या निमित्ताने चीनने गलवान खोऱ्यात आपला झेंडा फडकावला होता, तो भाग सुरुवातीपासूनच त्यांच्या ताब्यात आहे. मात्र भारतीय लष्कराशी संबंधित सूत्रांनी याला दुजोरा दिला आहे. चीनमधून एक व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या अन्य नेत्यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

भारतीय लष्कराच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नववर्षाला चीनी सैन्याने गलवान खोऱ्यात ज्याठिकाणी झेंडा फडकावला तो भाग सुरुवातीपासून चीनच्या हद्दीत आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्याच हद्दीत झेंडा फडकावला आहे. गलवान नदीचा परिसरावरुन भारत-चीनचा विवाद सुरू असल्याने चीनने आपल्याच हद्दीत झेंडा फडकावला आहे. असे सुत्रांनी सांगितले आहे.

व्हिडिओमुळे सुरू झाला वाद
नववर्षाला चीनी सैन्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ जारी केला होती. त्यामध्ये गलवान खोऱ्यात चीनी सैनिक झेंडा फडकावताना दिसत आहे. त्या व्हिडिओवर चीनी सैन्यांकडून असे लिहण्यात आले होती की, "नववर्ष 2022 च्या पहिल्याच दिवशी गलवान खोऱ्यात चीनचा झेंडा फडकवण्यात आला. हा ध्वज खास आहे कारण, हा झेंडा यावेळी बीजिंगमधील तियानमेन स्क्वेअरवर देखील फडकवण्यात आला आहे. असे चीनकडून लिहण्यात आले होते.

काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
व्हिडिओ समोर आल्यानंतर काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टिकास्त्र केले आहे. त्यांनी ट्विट करत लिहले होते की, "गलवानवर आमचा तिरंगाच छान वाटतो. त्यामुळे चीनला उत्तर द्यावे लागेल. मोदीजी काहीतरी बोला." असे म्हणत काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका केली होती. युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बीने देखील केंद्र सरकारवर टीका केली होती, ते म्हणाले होते की, "नवीन वर्षाच्या पार्श्वभुमीवर भारताच्या गलवान खोऱ्यात चीनने आपला झेंडा फडकावला. 56 इंचाचा चौकीदार कुठे आहे" असे म्हणत श्रीनिवास यांनी मोदींवर हल्लाबोल केला होता.

बातम्या आणखी आहेत...