आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचीनचे लष्कर वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) आपली घुसखोरी स्थायी बनवण्यासाठी पुन्हा हालचाल करत असल्याचे दिसून आले आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने अलीकडच्या काळात अक्साई चीन आणि सियाचीन हिमनदीच्या मध्यभागी असलेल्या लष्करी भागात २०० पेक्षा जास्त नवी निवारागृहे बनवली आहेत. हे निवारे तेथील चिनी सैनिकांना हिवाळ्यात उष्णता देण्याच्या उद्देशाने बनवले. संरक्षण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एलएसीच्या भारतीय संकल्पनेनुसार सियाचिनमधील बर्फाळ प्रदेशात भारतीय लष्कराप्रमाणे सुमारे १५ ते १८ किमी आत बसलेल्या सैनिकांसाठी पीएलएने आधीच प्री-फ्रॅबिकेटेड शेल्टर बनवले आहेत. हे शेल्टर तापमान नियंत्रित करतात व सैनिक कडाक्याच्या थंडीतही सज्ज राहतात. या अतिक्रमणाला आधार व लष्करी उपकरणे देण्यासाठी खोल क्षेत्रात लष्करी अड्डे आहेत. तेथूनच त्यांना मदत मिळते. यापैकी बहुतांश छावण्या ऑक्टोबरमध्ये जिनपिंग हे तिसऱ्या कार्यकाळासाठी राष्ट्रपतीपदासाठी मानांकित झाल्यानंतर बनवल्या.
भारतीय सैनिकांना पेट्रोलिंगमध्ये अडचणी : चीनी लष्कराने २०२० मध्ये लडाखच्या ५ भागांत अतिक्रमण केले होते. तेथून ते परत आले आहेत. मात्र, देपसांग व दमचौकमध्ये जुनी घुसखोरी कायम आहे. देपसांगमध्ये चीनी सैनिक सज्ज असल्याने भारतीय लष्कर पारंपरिक पेट्रोल पॉइंट्स (पीपी) १०, ११, १२, १३, १४ पर्यंत जाऊ शकत नाहीत. वरिष्ठ कमांडर पातळीच्या चर्चेत भारत देपसांग व दमचौकवर आक्षेप घेतला. देपसांगमध्ये नवी निवारागृहे झाल्याने चीनी लष्कर भविष्यात हटणार नाही.
{भारतासाठी हे क्षेत्र महत्त्वाचे : भारतासाठी हे क्षेत्र लष्करीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. हे क्षेत्र चीनच्या ताब्यातील अक्साई चीनला पाकव्याप्त काश्मीरशी जोडते. याच क्षेत्राच्या मार्गे चीन बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हअंतर्गत महामार्ग तयार करण्याचे काम करत राहिला.
दिव्य मराठी एक्स्पर्ट - डी. एस. हुडा, नि. लेफ्ट. जनरल, उत्तर कमांडचे माजी कमांडर
हे क्षेत्र लष्करीदृष्ट्या खूप महत्त्वाचे, तात्कालिक अर्थाने चीन भारताचे दावे कमकुवत करत आला देपसांगमध्ये चिनी पीपल्स लिबरेशन आर्मीच्या या डावाचा तात्कालिक अर्थ म्हणजे ते या क्षेत्रातून कोणत्याही परिस्थितीत हटण्यास तयार नाहीत. हा ताबा ते स्थायी बनवू इच्छित आहेत आणि भारतीय लष्कराची गस्ती रोखून भारताचे दावे कमकुवत करण्यास चिनी लष्कर चटावला आहे. हे क्षेत्र उंचीवर असतानाही खूप समतल आहे. तेथून जवळच असलेल्या डीबीओमध्ये भारतीय हवाई धावपट्टी आहे. समतल ठिकाणी रणगाड्यांचे आॅपरेशन यशस्वीपणे पार पाडता येऊ शकते. देपसांगनंतरच कराकोरम रेंज सुरू होते. याच्या दुसऱ्या बाजूने नुब्रा आणि श्योक व्हॅली आहे. पाकिस्तानकडून चीनला भेट म्हणून मिळालेली शाक्सगाम व्हॅलीदेखील या क्षेत्राला लागूनच आहे. परिणामी हे क्षेत्र भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे झाले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.