आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • China Not De Escalating Situation On LAC, Line Of Actual Control, Ladakh Front, People's Liberation Army

विश्वासघात:एकीकडे सीमेवरून सैन्य माघारीच्या गप्पा, दुसरीकडे चीनचे 40 हजार जवान तैनात

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चीनने शांतता चर्चेत गुंतवणूक ठेवत पुन्हा एकदा भारताचा केला विश्वासघात

चीनने शांतता चर्चेत गुंतवणूक ठेवत पुन्हा एकदा भारताचा विश्वासघात केला आहे. दोन्ही लष्करांच्या कोअर कमांडरांच्या बैठकीत तणाव कमी करण्यावर एकमत होऊनही चीनने आठवडा उलटला तरी पूर्व लडाखमधून आपले सैनिक मागे घेतलेले नाहीत. सूत्रांनुसार, पूर्व लडाखच्या आघाडीवर आणि मागील भागांत चीनचे ४० हजार शस्त्रसज्ज सैनिक पूर्वीसारखेच तैनात आहेत. त्यांच्याकडे एअर डिफेन्स यंत्रणा, सशस्त्र दलाच्या वाहतुकीसाठी वापरली जाणारे अवजड वाहने, दूर अंतरावर मारा करण्याची क्षमता असलेल्या तोफा यासारखी अवजड शस्त्रे आहेत.

लष्करी आणि सरकारच्या पातळीवर अनेकदा चर्चा होऊनही चीन ठरल्याप्रमाणे वादग्रस्त ठिकाणांवरून सैनिक हटवण्याचे आश्वासन पूर्ण करताना दिसत नाही. तणाव कमी करण्याचे कोणतेही संकेत नाहीत. दोन्ही लष्करांच्या कोअर कमांडरांच्या १४ व १५ जुलैच्या बैठकीच्या एक आठवड्यानंतरही तणाव असलेल्या भागातील स्थितीत बदल झालेले नाहीत.

ह्यूस्टनमधील चिनी वकिलात बंद करण्याचे अमेरिकेचे आदेश

वॉशिंग्टन | अमेरिका व चीन तणाव वाढत चालला आहे. अमेरिकेने चीनला ह्यूस्टन येथील वकिलात ७२ तासांत बंद करण्याचे आदेश दिले आहेत. हा निर्णय बेकायदेशीर असल्याचा आरोप करून चीनने या निर्णयाला चोख प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली. अमेरिकेच्या या आदेशाच्या काही तासांतच ह्यूस्टन येथील वकिलातीतून धूर निघताना दिसला. काही चिनी कर्मचारी गोपनीय कागदपत्रे जाळत होते.