आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरुणाचल प्रदेशचा जुना वाद:उपराष्ट्रपती नायडूंच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्याला चीनकडून आक्षेप, चीनचा आक्षेप अनाकलनीय : भारतीय परराष्ट्र मंत्रालय

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यावर आक्षेप घेतला आहे. चीनच्या या आक्षेपावर बुधवारी भारताने तेवढेच सडेतोड उत्तर दिले.भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, भारताच्या एका राज्यात देशाचे एक नेते गेल्यावर चीनचा आक्षेप अनावश्यक आणि भारतीय नागरिकांना समजण्यापलीकडे आहे. आम्ही चीनच्या अधिकृत प्रवक्त्याकडून आलेले निवेदन पाहिले आहे. आम्ही अशी वक्तव्ये फेटाळतो. अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग आहे. नायडू ९ ऑक्टोबर रोजी अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी राज्य विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला संबोधित केले होते.

चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजयान म्हणाले, सीमा मुद्‌द्यावर चीनची स्थिती सुसंगत आणि स्पष्ट आहे. चिनी सरकार कधीही भारतीय पक्षाद्वारे एकतर्फी आणि अवैध पद्धतीने स्थापित तथाकथित अरुणाचल प्रदेशाला मान्यता देत नाही आणि संबंधित क्षेत्रात भारतीय नेत्यांच्या दौऱ्याला कठोर विरोध करते.

अरुणाचल प्रदेशचा जुना वाद : चीन अरुणाचल प्रदेशाला दक्षिण तिबेटचा भाग मानतो. दोन्ही देशांत ३,५०० किमी लांब सीमा आहे. सीमावादामुळे दोन्ही देशांत १९६२ मध्ये युद्धही झाले आहे.