आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सैन्य प्रमुख जनरल एमएम नरवणे म्हणाले की, उत्तर सीमेवर आम्ही पूर्ण प्रकारे चौकस आहोत आणि कोणत्याही प्रकारच्या आव्हानासाठी तयार आहोत. पश्मी सीमेवर पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे. मात्र त्यांना स्पष्ट सांगण्यात आले आहे की, हे सहन केले जाणार नाही. जनरल नरवणे मंगळवारी सैन्याच्या वार्षिक प्रेस कॉन्फ्रेसमध्ये बोलत होते.
चीनला फर्स्ट मूव्हर एडवॉन्टेज मिळाले
लष्करप्रमुख म्हणाले, लडाखमधील संघर्षाच्या मोर्चांवर परिस्थिती बदललेली नाही. हिवाळा असो किंवा उन्हाळा असो, आपण मोर्चांवर उभे राहिले पाहिजे, अशी स्पष्ट सूचना सरकारची आहे. संवादातून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, पण समाधान परस्पर सुरक्षेवर आधारित असेल. जर उपाय सापडला नाही तर त्यासाठीही तयार आहोत. आम्ही सतत चीनच्या हालचालींवर नजर ठेवत आहोत. पण त्यांना फर्स्ट मूव्हर एडॉन्टेज होते. पहिले येणाऱ्याला नेहमी हा फायदा होतो.
हिवाळ्यात सीमेवर जवान तैनात आहेत या प्रश्नावर ते म्हणाले, 'आम्ही सैनिकांसाठी हिवाळ्यापासून बचाव आणि आवश्यक उपकरणे उपलब्ध केले आहेत. आपल्या जवानांचा आत्महविश्वास खूप मोठा आहे. चिंतेची कोणतीही बाब नाही.'
पाकिस्तानला संदेश - आपला वार अचूक होईल
जनरल नरवणे म्हणाले की, - पाकिस्तान दहशतवादाला सरकारी निती म्हणून वापरत आला आहे. आम्ही हे स्पष्ट केले आहे की, पलटवारचा आपला अधिकार सुरक्षित आहे. आपण याचे ठिकाण आणि वेळ ठरवू आणि आपला वार अचूक होईल.
सैन्यात तंत्रज्ञानावर फोकस
जनरल नरवणे म्हणाले की, भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सैन्यात बदल केले जात आहेत. तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित केले जात आहे. आपली ऑपरेशनल सज्जता जास्त आहे आणि सैनिकांचा आत्मविश्वासही खूप आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.