आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनची नरमाईची भूमिका:एलएसीवरील तणाव संपवण्याची तयारी, चीन मागे हटू शकतो, चिनी परराष्ट्रमंत्र्यांच्या भारत दौऱ्यात होऊ शकतो निर्णय

मुकेश कौशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

युक्रेन-रशिया युद्धाचा परिणाम जागतिक राजकारणावर होत आहे. याचा फायदा पूर्व लडाखच्या एलएसीवरून चिनी सेना माघारी परतण्यातही होऊ शकतो. मागील वर्षी फेब्रुवारीत पेंगोंग सरोवराच्या उत्तर व दक्षिण टोकावर समोरासमोर सैन्य तैनाती सुरू झाली होती. एलएसीवर सेना मागे घेण्याचा फॉर्म्युला शोधण्यात आणि भारतासोबतचे संबंध मजबूत करण्यासाठी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिल्लीत येत आहेत. वांग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ब्रिक्स शिखर बैठकीत सहभागी होण्यासाठी बीजिंगला येण्याचे निमंत्रण देतील. भारत सहमत झाल्यास ब्रिक्स तयारी बैठकीसाठी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकरही जातील.

माजी लष्करप्रमुख जन. व्ही.पी. मलिक यांचे या मुद्द्यावर मत...

चीनची वागणूक सौम्य का झाली ?
- कारण, रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतीनना असे वाटते. युक्रेननंतर सैन्य कारवाई सुरू केल्यानंतरच्या घडामोडींत रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन जागतिक समुदायासमोर मजबूत राहू पाहत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यासोबत राहून ते बीजिंगमधून पश्चिमी देशांना मोठा संदेश देऊ पाहत आहेत. हे ब्रिक्स आणि आरआयसी (रशिया, भारत, चीन) फोरमद्वारेच शक्य आहे. या दोन्ही प्रकारच्या शिखर शिखर परिषदांचे होस्टिंग सध्या चीनकडे आहे. परंतु, एलएसीच्या मुद्द्यावर भारताने स्पष्ट केले की, सीमेवरील तणाव निवळला तरच मोदींची बैठकीत उपस्थिती शक्य होईल. त्यामुळे चीन नरमला आहे. माॅस्को करार लागू करून समस्येचे निराकरण होऊ शकते.

मॉस्को करार काय आहे?
मॉस्को करार भारत आणि चीनमध्ये १० सप्टेंबर २०२० रोजी झाला होता. यात अनेक गोष्टी अशा आहेत ज्यामुळे चीन 5 गोष्टींवर अंमल करण्यास बाध्य होऊ शकतो.
1. दोन्ही देश या नेत्यांत झालेल्या सहमतीचे पालन करत मतभेदांचे वादात पर्यावसान करणार नाहीत.
2. सेनांमध्ये संवाद व्हावा, , लवकरात लवकर सैन्य तैनाती हटवून योग्य अंतर राखावे. 3. दोन्ही देशांनी परिस्थिती बिघडण्याची शक्यता असेल अशा कारवाया करू नये.
4. सीमा वादावर प्रतिनिधींचे संभाषण सुरूच ठेवत सल्लामसलत आणि समन्वय प्रणालींनीही बैठका सुरू ठेवाव्यात.
5. परिस्थिती सामान्य झाल्यानंतर आत्मविश्वास निर्माण करण्याचे उपायही केले जावेत.

चीनला आपल्या परराष्ट्रमंत्र्यांच्या भारत दौऱ्याची घाई का आहे ?
जपानी पंतप्रधान फुमियो किशिदा १९ मार्चला भारतात येत आहेत. हे बघून रशिया आणि चीन त्वरेने मुत्सद्देगिरीने पावले उचलू पाहत आहेत. किशिदा क्वाड बैठकीत मोदींच्या भागीदारीसाठी येत आहेत. ही बैठक टोकियोत जूनमध्ये होईल. तेथे मोदी आणि अमेरिकी राष्ट्रपती मंचावर असतील. रशियाचे प्रयत्न असे असतील की त्याच वेळी जगातील तीन शक्तिशाली नेते म्हणून मोदी-पुतीन-जिनपिंग एकत्रितपणे मंचावर उपस्थित राहू शकतील.

बातम्या आणखी आहेत...