आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय:चीनने मक्कीला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव रोखला, मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड सईदचा मेहुणा

नवी दिल्ली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानी दहशतवादी अब्दुल रहेमान मक्कीला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून ग्लोबल टेररिस्ट घोषित करण्यासाठी भारत व अमेरिकेच्या संयुक्त प्रस्तावाला शुक्रवारी चीनने विरोध दर्शवला. सुरक्षा परिषदेच्या समिती अंतर्गत मक्कीला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव करण्यात आला होता. परंतु पाकिस्तानचे मित्रराष्ट्र चीनने ऐनवेळी विरोध केला. मक्की अमेरिकेने बंदी घातलेल्या लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या व मास्टरमाइंड हाफिज सईदच्या पत्नीचा भाऊ आहे. त्याने लष्कर-ए तोयबाच्या कारवायासाठी पैसा गोळा करण्याची भूमिका निभावली. यापूर्वी देखील चीनने पाकिस्तानातील जैश-ए-मोहंमदचा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवाद्याच्या यादीत समाविष्ट करण्याचा प्रयत्न रोखला होता. चीनने मात्र हा निर्णय नियमानुसार घेण्यात आल्याचा दावा केला आहे. वास्तविक अमेरिकेला पाकिस्तानवर विश्वास नाही. म्हणूनच अमेरिका मक्कीबद्दलची माहिती संकलित करते.

बातम्या आणखी आहेत...