आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • China | Marati News | The Flag Was Hoisted 28 Km Away From Galwan, With The Help Of The Actor

ड्रॅगनचे नकली दात:गलवानपासून 28 किमी दूर झेंडा फडकवला, अभिनेत्याची घेतली मदत

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नववर्षाच्या सुरुवातीलाच चीनचा खोटारडेपणा समोर आला. आक्रमक पवित्रा दर्शवण्यासाठी गलवान खोऱ्यात झेंडा फडकवल्याचा समारंभ चीनने दाखवला होता. संरक्षण सूत्रांनी सांगितले की, समारंभाचा बनावट व्हिडिओ तयार करण्यात आला आणि त्यासाठी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने चिनी अभिनेता वू जिंग आणि त्याची पत्नी शी नान यांच्याकडून अभिनय करवून घेतला होता. चीनने गलवान नदीपासून सुमारे २८ किलोमीटर मागे अक्साई चीनमध्ये चित्रीकरण केले होते. भारताच्या या भागावर चीनचा अवैध ताबा आहे. भारताच्या लष्करी अधिकाऱ्यांनी याप्रकरणी टिप्पणी करण्यास नकार दिला. तथापि, आपल्या गलवानमध्ये काही झाले नाही, हे स्पष्ट केले.

वू जिंगने अनेक चिनी चित्रपटांत सैनिकाची भूमिका केली आहे. ‘बॅटल ऑफ लेक चांगजिंग’मध्ये तो पीएलए सैनिक झाला होता. वू जिंग आणि शी नान यांना घेऊन चीनी अधिकारी ख्रिसमसच्या दिवशी शूटिंग करण्यास गेले होते.

पँगाँग सरोवरावरील चीनच्या पुलावर सरकारची बारीक नजर
६० वर्षांपासून चीनच्या अवैध कब्जात असलेल्या भागात पँगाँग सरोवरावर पूल उभारत असल्याचे वृत्त आल्यानंतर भारत चीनच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, गेल्या आठवड्यात चीनने अरुणाचल प्रदेशच्या काही स्थानांची नावे बदलली असल्याचे वृत्त आले आहे. त्यावर आक्षेप नोंदवला आहे.

बातम्या आणखी आहेत...