आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी सांगितले की, भारतातील चिनी कंपन्यांना हायवे प्रकल्पांत सहभागी करून घेतले जाणार नाही. एमएसएमईसारख्या क्षेत्रांमध्येही चिनी कंपन्यांना गुंतवणूक करता येणार नाही. एका मुलाखतीत गडकरी म्हणाले, रस्तेबांधणीसाठी ज्या कंपन्यांत चीनची भागीदारी आहे अशा कंपन्यांना संधी नसेल. सध्या मंजूर निविदांमध्येही एखाद्या कंपनीत चीनची भागीदारी असेल तर त्या निविदा पुन्हा मागवल्या जातील. तंत्रज्ञान, कन्सल्टन्सी असो किंवा डिझाइन कोणत्याच क्षेत्रात चिनी कंपनी आता पार्टनर म्हणून चालणार नाही.
टिकटॉकला ४५,३०० कोटींचा बसणार फटका
भारतात चिनी अॅप्सवर बंदीनंतर चिनी सरकारी मुखपत्र ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे की, टिकटॉकवर बंदीमुळे पॅरेंट कंपनी बाइटडान्सला सुमारे ६ अब्ज डाॅलरचा (४५,३०० कोटी) फटका बसेल. दोन्ही देशांत आता व्यापार युद्ध सुरू होईल, असा इशारा देऊन यात भारताचे नुकसान होईल, असे टाइम्सने म्हटले आहे.
बीएसएनएलने ४-जी अपग्रेड टेंडर केले रद्द
बीएसएनएलने आपले ४-जी अपग्रेडचे टेंडर रद्द केले आहे. या कामात बहुतांश उपकरणे चिनी आहेत. चिनी उपकरण वापरले जाऊ नये म्हणून ही कार्यवाही करण्यात आली. आता यात पूर्ण मेक इन इंडिया असेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.