आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • China's Evil, Preparing To Deploy Missiles On The Shores Of Mansarovar; Dragon Movements At A Distance Of Only 90 Km From The Indian Border

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रद्धेवर प्रहार:मानसरोवराच्या काठावर चीनच्या कुरापती, क्षेपणास्त्र तैनात करण्याची करतोय तयारी; भारतीय सीमेपासून अवघ्या 90 किलोमीटर अंतरावर ड्रॅगनच्या हालचाली

नवी दिल्ली5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • क्षेपणास्त्र जमिनीतून हवेत हल्ला करण्यात सक्षम, ट्विटर युजरचा दावा-100 किमी भागात चिनी सैन्याच्या हालचाली

भारतीय सीमेपासून सुमारे ९० किमी अंतरावर चीन क्षेपणास्त्र तैनात करण्याच्या तयारीत आहे. उपग्रहाच्या छायाचित्रांतून दिसते की, चीन कैलास पर्वताजवळ पवित्र मानसरोवरच्या काठावर जमिनीतून हवेत हल्ला करणाऱ्या क्षेपणास्त्रांचे तळ बनवत आहे. या तळाचे काम एप्रिलमध्ये सुरू झाले होते, जे आता जवळपास पूर्ण होत आहे. सूत्रांनुसार हे चीनचे षड्यंत्र आहे. त्याला कैलास- मानसरोवरसारख्या धार्मिक स्थळाला लष्कराने वेढा देत डाेंगराचे पावित्र्य संपवायचे आहे. लडाखमधील तणावानंतर हे सुरू झाले आहे. चीनने भारताने लिपुलेखमध्ये रस्ता बनवण्याच्या विरोधात या तळाची निर्मिती केली आहे. भारताने १७ हजार फूट उंचीवरील कैलास मानसरोवरला जाण्यासाठी लिपुलेखजवळ ८० किमी लांब रस्ता बनवला होता.

उपग्रहाद्वारे मिळालेल्या छायाचित्रांतून दिसते की, चीन मानसरोवराच्या काठावर एचक्यू- ९ क्षेपणास्त्र तैनात करण्याच्या तयारीत आहे. ती मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र असतील. चीन येथे एटी- २३३ रडार यंत्रणाही उभारत आहे. याद्वारे क्षेपणास्त्राची फायर सिस्टिम काम करते. तसेच टाइप ३०५ बी, टाइप १२०, टाइप ३०५ए, वायएलसी- २० आणि डीडब्ल्यूएल-००२ रडार यंत्रणाही लावण्यात येत आहे. हे सर्व लक्ष्याचा माग घेऊन ते नष्ट करण्यास मदत करतात. तज्ञांच्या मतानुसार चीनच्या वायुदलाची इच्छा आहे की, त्यांना भारतीय सीमांवर नजर ठेवता यावी आणि भारतीय वायुदलाला उत्तर देता यावे. यासाठी भारतीय धार्मिक भावना दुखावण्यासाठी चीन अशा कारवाया करत आहे. लिपुलेखबाबत सध्या भारत व नेपाळ दरम्यान तणाव सुरू आहे. चीनला याचाच फायदा घ्यायचा आहे.

ट्विटर युजरचा दावा-१०० किमी भागात चिनी सैन्याच्या हालचाली

चीनचा ओपन सोर्स इंटेलिजन्स ट्विटर युजर @detresfa याने एक उपग्रह छायाचित्र ट्वीट केले आहे. लिहिले, लिपुलेखमध्ये ट्राय जंक्शन भागात क्षेपणास्त्रांचे तळ होत आहे. तेथे सैनिक तैनात आहेत. येथे १०० किमी परिसरात चीनचे लष्कर पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) हालचाली वाढल्या आहेत. पीएलएने येथे आधी यात्रेकरूंसाठी छोटीशी तात्पुरती निवास व्यवस्था केली होती. येथे हॉटेल्स व घरे बांधली. मात्र, गेल्या काही महिन्यात येथे एक महामार्ग, नवे हॉटेल्स आणि नव्या इमारती झाल्या आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser