आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लडाखवरून चीनशी पेटलेल्या वादानंतर उत्तराखंडातील सीमेवरील भागात तणाव वाढला आहे. साधारणत: शांतता असलेल्या खोऱ्यात भारतीय लष्कराची सक्रियता व तयारी वाढली आहे. १९६२ च्या युद्धात चीनने या भागास लक्ष्य केले होते. आमचा पहिला मुक्काम उत्तरकाशी जिल्ह्यातील ७० किमी दूरचा भाग हर्षिल व ७८ किमी दूर अंतरावर नेलांग खोरे आहे. येथील लोक दबक्या आवाजात सांगतात, ‘सीमेपलीकडे लष्करी हालचाली वाढल्या आहेत. गेल्या तीन दिवसांत अनेकदा चिनी हेलिकॉप्टर्सचा आवाज ऐकू येतो. परंतु हेलिकाॅप्टर कोणी पाहिले नाही.’ येथील खोऱ्यात मेंढपाळांचे कळप शेळ्या व मेंढ्या चरायला नेतात. येथूनच चीनच्या सीमेपर्यंत रस्ता जातो.
नेलांग खोऱ्याच्या वाटेत बीआरओ जवान रस्ता तयार करत आहेत. खूप चौकशी केल्यानंतर गीता देवी नावाच्या वृद्धा सांगतात, या भागात अजून तरी चीनने काही कारवाया केल्या नाहीत. आपले लष्कर सतर्क आहे. सुरेश रमोला यांनी सांगितले, आॅक्टोबरमध्ये बर्फवृष्टी सुरू असताना, लोक खालच्या पट्ट्यात निघून जातात. मेअखेरीस परत येतात. लाॅकडाऊन काळात रस्ते बंद झाले आहेत. परंतु तणावाची माहिती मिळाल्याने परतले आहेत. एका वरिष्ठ पत्रकाराने सांगितले, भारत-चीन सीमेवर नेलांग खोऱ्यातील बगोरी हे शेवटचे गाव आहे.
मुनस्यारीच्या लोकांना विश्वास नेपाळ सरळ मार्गाने वागेल
मुनस्यारी (पिठोरागड ) | उत्तराखंडातील पिठोरागड जिल्ह्याचा हा सीमेवरील परिसर. एका बाजूला तिबेट व दुसरीकडे आपली सीमा आहे. चारही गावांच्या समोरच हिमालय पर्वत रांगेतील जगप्रसिद्ध पंचचूली पर्वत (हिमालयाची पाच शिखरे) आहेत. शेतीकामात गुंतलेल्या लोकांसाठी चीन अथवा नेपाळच्या तणावाचा मुद्दा नसतो. स्थानिक पं. दीनानाथ यांनी सांगितले, चीनवरून आम्ही चिंता का करावी? आडवा हिमालय व देवी-देवतांची मंदिरे आमचे रक्षण करतात.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.