आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियंत्रण रेषेवर तणाव:अरुणाचलच्या सीमेलगत चीनच्या हालचाली वाढल्या; भारतही सज्ज, सीमेवर तैनाती वाढली, अहोरात्र निगराणी सुरू

रूपा (अरुणाचल प्रदेश)एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) दीड वर्षापासून तणाव असतानाच चीनने ईशान्येत अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या सीमेवर हालचाली वाढवल्या आहेत.

लष्कराच्या पूर्व कमांडचे कमांडर लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी सांगितले की, भारताने पूर्व भागात कुठल्याही आकस्मिक स्थितीला तोंड देण्यासाठी योजना तयार केली आहे. प्रत्येक भागात पुरेशी सुरक्षा दले आहेत. भारताच्या समग्र लष्करी आधुनिकीकरणाची माहिती देताना त्यांनी सांगितले की, इंटिग्रेटेड बॅटल ग्रुपला तत्त्वत: मान्यता दिली. तो जास्त प्रभावी तर असेलच, शिवाय प्रत्येक हल्ल्याला उत्तर देण्यास तयार राहील. त्यात पायदळातील सैनिक, रणगाडे, हवाई सीमा सुरक्षा व लॉजिस्टिक युनिटसहित सर्व फील्डचे सैनिक एकत्र काम करतील. आयबीजी सर्वात प्रथम पाकिस्तान व चीन सीमेवर तैनात केले जाईल. भारत व चीन दोघेही एलएसीजवळ पायाभूत सुविधा विकसित करत आहेत. त्यामुळे कधी-कधी समस्या निर्माण होते.

सीमेवर तैनाती वाढली, अहोरात्र निगराणी सुरू
लेफ्टनंट जनरल पांडे म्हणाले की, नव्या पायाभूत सुविधा विकसित झाल्यानंतर सैनिकांची तैनाती वाढली आहे. भारताने एलएसीच्या जवळ निगराणी वाढवली आहे. भारतीय लष्कर इस्रायलमध्ये निर्मित हेरान ड्रोनने एलएसीवर अहोरात्र निगराणी करत आहे. लष्कराने अत्याधुनिक रुद्र हेलिकॉप्टर तैनात केले आहे. चीन वारंवार सीमा करार आणि प्रोटोकॉलचा भंग करत असल्याबद्दल पांडे म्हणाले की, या मुद्द्यावर उच्चस्तरीय चर्चा सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...