आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • China's People's Liberation Army (PLA) Kidnaps 5 Indians From Arunachal Pradesh, Claims Congress MLA Ninong Ering

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अरुणाचल प्रदेशमध्ये चिनी सैन्याचे कृत्य:चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने अरुणाचल सीमेवरुन केले 5 मुलांचे अपहरण, राज्यातील काँग्रेस आमदाराचा दावा

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अरुणाचल प्रदेशचे काँग्रेस आमदार निनॉन्ग एरिंगनुसार, सर्व मुलं सुबानसिरी जिल्ह्यातील नाछो क्षेत्रात राहणारे आहेत
  • एरिंग म्हणाले - ज्यावेळी राजनाथ सिंह हे मॉस्कोमध्ये चीनच्या संरक्षण मंत्र्यांना भेटत होते त्याच वेळी ही घटना घडली

अरुणाचल प्रदेशातील गावातून चिनी सैनिकांनी पाच मुलांचे अपहरण केल्याचे वृत्त आहे. त्यांच्याबरोबर आणखी दोन लोक होते, जे स्वत: चा बचाव करण्यात यशस्वी ठरले. घटना नाछो भागातील आहे. हे सुबानसिरी जिल्ह्यात येते. गावातील लोक आज भारतीय सैन्य अधिकार्‍यांना भेटणार आहेत.

राज्याचे कॉंग्रेसचे आमदार निनॉन्ग एरिंग यांनीही ट्विटरवर अपहरण झालेल्या मुलांची नावे दिली आहेत. एरिंग म्हणाले - चिनी सैनिकांनी नाछो शहरात राहणाऱ्या पाच मुलांना पळवून नेले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह रशिया आणि चीनच्या संरक्षण मंत्र्यांची भेट घेत असताना ही घटना घडली. पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए किंवा चायना आर्मी) च्या या कृतीतून खूप चुकीचा संदेश जाईल. चीनला योग्य उत्तर अवश्य द्यायला हवे.

एरिंगने ट्विटसह फेसबुकचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांनी कोणत्या भारतीयांचे अपहरण केले आहे त्याचे वर्णन केले आहे. मात्र, पाच मुलांचे अपहरण केव्हा झाले हे त्याने सांगितले नाही.

हे तागिन समुदायाचे मुलं आहेत
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अपहरण करण्यात आलेले सर्व पाचही मुलं हे तागिन समुदायाचे आहेत. यीनी सैनिकांनी नाछो क्षेत्राच्या जंगलांमधून त्यांना उचलून नेले. हे क्षेत्र सुबानसिरी जिल्ह्यात येते. घटनेची माहिती त्यांच्या एका नातेवाईकाच्या माध्यमातून समोर आली. यानंतर काँग्रेस आमदारांनी ट्विट केले. अपहरण करण्यात आलेल्या पाचही मुलांची नावे पुढील प्रमाणे आहेत. टोक सिंग्काम, प्रसात रिंगलिंग, दोंग्तु इबिया, तानु बेकर आणि नागरू दिरि. या लोकांसोबत गावातील आणखी दोन लोक होते. मात्र ते पळ काढण्यात यशस्वी झाले.

आश्चर्य म्हणजे या घटनेची माहिती समुदायातील किंवा गावातील लोकांनी भारतीय सैनिकांना दिली नाही. शनिवारी काही लोकांनी सांगितले की ते भारतीय सैन्य दलाला या घटनेची माहिती देणार आहेत. गावात भीतीचे वातावरण आहे.

मार्चमध्येही असेच घडले होते
या वर्षी मार्चमध्ये चीनवर याच क्षेत्राच्या 21 वर्षाच्या मुलाचे अपरण केल्याचा आरोप लावण्यात आला होता. हे गाव मॅकमोहन लाइनच्या जवळ आहे. काँग्रेस आमदार एरिंग यांनी शनिवारी याच क्षेत्रातील पाच मुलांचे अपहरन केल्याचा आरोप चीनवर लावला आहे.

लद्दाखपासून ते अरुणाचल प्रदेशपर्यंत चीन सैन्य तैनात करणे वाढवत आहे. याच काळात मुलांचे अपहरण झाल्याचे वृत्त समोर आले. पँगॉन्ग सो झीलवर कब्जा करण्याचा चीनचा प्रयत्न भारताने हाणून पाडला आहे. याच्या दक्षिणी भागांमधील पर्वतांमध्ये आता आपले सैनिक तैनात आहेत.