आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • National
 • China's Tech Company Monitoring Over 10,000 Indian Individuals And Organisations Including Narendra Modi And Sonia Gandhi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीन करतोय हेरगिरी:नरेंद्र मोदी, राष्ट्रपती कोविंद, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यासह भारतातील 10 हजार मोठे लोक आणि संस्थांवर चीनची नजर, चीन सरकारशी संबंधित डेटा कंपनी गोळा करतीये प्रत्येक माहिती

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • 8 केंद्रीय मंत्री, मुख्य न्यायाधीश आणि सीडीएस बिपिन रावत यांच्यावरही चीनची नजऱ
 • इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसने 2 महिन्यांच्या तपासणीनंतर याचा खुलासा केला

चीन सरकारशी संबंधित एक मोठी डेटा कंपनी 10,000 भारतीय लोक आणि संस्थांवर नजर ठेवून आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रपती राम नाथ कोविंद आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, त्यांचे कुटुंबिय, अनेक कॅबिनेट मंत्री आणि मुख्यमंत्री यांचा समावेश आहे. न्यायालयीन, व्यवसाय, क्रीडा, माध्यम, संस्कृती आणि धर्म या क्षेत्रातील सर्व स्तरातील लोकांवर चीनची नजर आहेत. एवढेच नाही तर फौजदारी खटल्यांचा आरोप असलेल्यांवरदेखील नजर ठेवले जात आहे. इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसच्या तपासात हा खुलासा झाला आहे.

या मोठ्या व्यक्तीवर चीनची नजर

 • नरेंद्र मोदी, पंतप्रधान
 • रामनाथ कोविंद, राष्ट्रपती
 • जेपी नड्डा, भाजप अध्यक्ष
 • सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष
 • मनमोहन सिंह, माजी पंतप्रधान
 • राहुल गांधी, काँग्रेस नेता
 • प्रियंका गांधी, काँग्रेस नेता
 • बिपिन रावत, चीफ ऑफ डिफेंस स्टाफ
 • एस ए बोबडे, चीफ जस्टिस ऑफ इंडिया
 • जी सी मुर्मू, कॉम्प्ट्रॉलर अँड ऑडिटर जनरल (CAG)
 • अमिताभ कांत, नीति आयोगाचे सीईओ
 • रतन टाटा, चेअरमन (एमेरिटस), टाटा ग्रुप
 • गौतम अडाणी, चेअरमन, अडाणी ग्रुप
 • सचिन तेंदुलकर, क्रिकेटर
 • श्याम बेनेगल, चित्रपट दिग्दर्शक

8 केंद्रीय मंत्री

 • राजनाथ सिंह
 • निर्मला सीतारमण
 • रविशंकर प्रसाद
 • पीयूष गोयल
 • स्मृति इराणी
 • वीके सिंह
 • किरण रिजिजू
 • रमेश पोखरियाल निशंक

5 मुख्यमंत्री

 • शिवराज सिंह चौहान, मुख्यमंत्री, मध्य प्रदेश
 • अशोक गहलोत, मुख्यमंत्री, राजस्थान
 • उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र
 • अमरिंदर सिंह, मुख्यमंत्री, पंजाब
 • ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल

7 माजी मुख्यमंत्री

 • रमन सिंह, छत्तीसगढ़
 • अशोक चव्हाण, महाराष्ट्र
 • के सिद्धारमैया, कर्नाटक
 • हरीश रावत, उत्तराखंड
 • लालू प्रसाद यादव, बिहार
 • भूपिंदर सिंह हुड्डा, हरियाणा
 • बाबूलाल मरांडी, झारखंड

राजकारण्यांचे कुटुंबीयही देखरेखीखाली आहेत

 • सविता कोविंद, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या पत्नी
 • गुरशरण कौर, माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंह यांच्या पत्नी
 • जुबिन इराणी, केंद्रीय मंत्री स्मृति इराणी यांचे पती
 • सुखबीर सिंह बादल, केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांचे पती
 • डिंपल यादव, यूपी के माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी

तिन्हा सैन्यांच्या 15 माजी प्रमुखांची ट्रॅकिंग

या अहवालानुसार, चीनमधील शेनझेन शहरातील शिन्हुआ डेटा माहिती तंत्रज्ञान कंपनी भारतीयांवर रिअल टाइम मॉनिटरिंग करीत आहे. यांच्या निशाण्यावर भारतातील जे लोक आणि संघटना आहेत, त्यांच्या प्रत्येक लहान-मोठी माहिती गोळा केली जात आहे. इंडियन एक्सप्रेसने 2 महिन्यांपासून मोठ्या डेटा साधनांचा वापर करून झेनहुआच्या मेटा डेटाच्या तपासणीच्या आधारे हे उघड केले आहे. यानुसार तीन सैन्यातील 15 माजी प्रमुख, 250 ब्यूरोक्रेट आणि मुत्सद्दी यांची ट्रेकिंग केली जात आहे.

Open Divya Marathi in...
 • Divya Marathi App
 • BrowserBrowser