आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी दिल्ली:गोगरातून 15 महिन्यांनी चीन व भारतीय सैन्याचीही माघार; आता दोनच भागांत वाद, चीनने 100 बांधकामे पाडली

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएएसी) १५ महिन्यांपासून सुरू असलेल्या वादानंतर चिनी लष्कर आणखी एका भागातून मागे हटले आहे. चीन-भारताच्या लष्करी कमांडर्सची ३१ जुलैला १२ व्या टप्प्यातील बैठक सुमारे ९ तास चालली होती. त्यातील सहमतीनंतर गोगरामध्ये समोरासमोरील तैनाती संपुष्टात आली आहे. चिनी लष्कर ४ व ५ ऑगस्टला आपल्या स्थायी तैनाती बिंदूवर परतले आहे. यानंतर भारतीय लष्करही वादापूर्वीच्या स्थायी तैनाती बिंदूवर परतले.

या घटनाक्रमानंतर आता भारत-चीनमध्ये दोनच मुद्द्यांवरील वाद उरला आहे. पैकी एक हाॅट स्प्रिंग भागातून लष्कर हटवण्यावर कमांडर्सच्या १३ व्या टप्प्यातील बैठकीत एकमत होऊ शकते. दुसरीकडे, देपसांगचा वाद सुटल्यानंतर एलएसीवरून सैन्य तैनात कमी करण्यावर समझोता होऊ शकतो. भारतीय लष्कराच्या पश्चिम कमांडने शुक्रवारी सांगितले की, ‘गोगरावर दोन्ही पक्षांनी लष्करी व तात्पुरती बांधकामे हटवली आहेत.

चिनी लष्कराने या भागात बंकर, टेहळणी चौक्या आणि फायरिंग पोझिशन्ससह १०० बांधकामे उभारली होती. त्यांना ती सर्व पाडावी लागली आहेत.

बातम्या आणखी आहेत...