आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालडाखमध्ये १६ महिन्यांपासून सुरू असलेला लष्करी वाद मिटवण्यासाठी चर्चेच्या १५७२ फेऱ्या झाल्या आहेत. या बैठका २० तास चाललेल्या आहेत. तरीही लडाखमध्ये २ आघाड्यांवर संघर्षाची स्थिती कायम आहे. चीनसोबतची ही चर्चा दीर्घकाळ का चालते, निकाल लवकर का लागत नाही, याबाबत काही गोष्टी समोर आल्या आहेत. चीनची जबाबदारी सांभाळलेले माजी परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी निवृत्तीनंतर लिहिलेल्या ‘द लाँग गेम : हाऊ द चायनीज निगोशिएट विथ इंडिया’ या पुस्तकात चिनी प्रतिनिधींच्या धूर्त चालींवर प्रकाश टाकला आहे. गोखलेंनी चीनला मान्यता, भारताचे अणुस्फोट, दहशतवादी मौलाना मसूद अझहरला यूएनच्या काळ्या यादीत टाकण्याबाबत १० वर्षे चाललेल्या चर्चेच्या अनुभवांवरून चिनी वार्ताकारांच्या प्रत्येक चालीचा बारकाईने परामर्श घेतला आहे.
मसूद अझहरला यूएनच्या ब्लॅक लिस्टमध्ये टाकणे भारताला सोपे वाटत होते, पण चीनने हा मुद्दा तब्बल १० वर्षे चर्चेत अडकवून ठेवला... चिनी प्रतिनिधींच्या अशा असतात चाली
- चर्चेचे स्थान स्वत: निश्चित करतात.चर्चेचा अजेंडा आपल्या माध्यमांत लीक करून त्यावर भारताचे मत आजमावतात.{आरोपांचा भडिमार करतात. तुम्ही अडेलतट्टू आहात, चर्चा निष्फळ राहिल्यास जबाबदारी तुमची असे वार्ताकारांना सांगतात.
- चर्चा सुरू होण्याआधी अटी लादतात. मसूद अझहर प्रकरणात भारताने आधी पाकशी चर्चा करावी यावर ते भर देत होते.
- प्रतिनिधी मंडळात फक्त एक जण बोलतो, इतर गप्प राहतात. चिनी म्हणींचा वापर करत सहकाऱ्यांशी सांकेतिक भाषेत बोलतात.
- हिंदी येत असूनही अनभिज्ञ असल्याचे दाखवतात. भारतीय जेव्हा परस्परांत हिंदीत बोलतात, तेव्हा सर्व मुद्दे लिहून घेतात.{परस्परांत जोरजोराने बोलून समोरच्याला धमकावतात. चर्चेच्या वेळी निर्णय घेत नाहीत.
- चर्चेत आधी सिद्धांत ठरवण्यावर भर देतात. नंतर स्वत: त्यापासून माघार घेतात, पण समोरच्यांना त्याच मर्यादेत ठेवतात.
- चर्चेत केव्हाही चुप्पी साधून समोरच्या व्यक्तीला वारंवार बोलण्याची संधी देतात. मनाप्रमाणे चर्चा होत असली तरी आपल्याला काहीही मंजूर नाही, असेच दाखवत राहतात.
पडद्यामागे यांचे काम
सेंट्रल फॉरेन अफेअर्स कमिशन : चर्चेचा निकाल ठरवते. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे थेट नियंत्रण.
एमएसएस : स्टेट सिक्युरिटी मंत्रालय
युनायटेड फ्रंट ऑफ वर्क डिपार्टमेंट : चिनी नाव आहे-झांगयांग तोंगझी झानशियान गोंगझू बू.
आयएलडी : कम्युनिस्ट पक्षाचा विभाग.
स्टेट कौन्सिल इन्फर्मेशन ऑफिस : चिनी माध्यमांत मत बनवते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.