आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Chinese Foreign Minister Wang Yi's Visit To India; China's Efforts To Improve Image, But Ladakh Important For India| Marathi News

भारत दौरा:चिनी परराष्ट्रमंत्री वांग यी यांचा भारत दौरा; प्रतिमा सुधारण्यासाठी चीनचे प्रयत्न, पण भारतासाठी लडाख महत्त्वाचे

दिल्‍ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांचा भारत दौरा अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे. युक्रेन युद्ध व बदललेल्या जागतिक परिस्थितीवर चीन स्वत:चा पाठिंबा वाढवू लागला आहे.

चिनी परराष्ट्रमंत्र्यांच्या दौऱ्याचा अर्थ काय?
वांग डिसेंबर २०१९ मध्ये भारतात आले होते. त्यानंतर युक्रेन युद्धादरम्यान त्यांची भेट भारत व चीन यांच्यातील आधीपासून सुरू असलेल्या लडाखसह अनेक मुद्यांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते. या दौऱ्यानंतर लडाखच्या मुद्द्यावर भारत व चीन यांच्यात लवकरच तोडगा निघेल, असा विचार करणे घाईचे ठरेल. परंतु सहमतीच्या दिशेने हा दौरा पूरक ठरू शकतो.

बैठक का महत्त्वाची?
लडाखच्या गलवान खोऱ्यातील धुमश्चक्रीनंतर पहिल्यांदाच गुरुवारी चीनचे परराष्ट्रमंत्री भारतात दाखल झाले. ५ मे २०२० ला पोंगाँग तलाव क्षेत्रात दोन्ही बाजूंनी सशस्त्र सैनिकांना तैनात केले गेले होते. या बैठकीद्वारे सैन्य व इतर मुद्द्यांवर आवश्यक चर्चा होईल. दोन्ही बाजूंनी फेब्रुवारी २०२१ मध्ये उत्तर व दक्षिण क्षेत्रातील वादग्रस्त मुद्द्यांची सोडवणूक केली. परंतु चीनने अजूनही सैन्य हटवलेले नाही. त्यामुळे ५० हजार सशस्त्र सैन्य अजूनही सीमेवर आहे.

बीजिंगकडून हे आऊटरिच का?
चीनचे परराष्ट्रमंत्री ब्रिक्स संमेलनाबाबत नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा करतील. म्हणूनच हा दौरा दोन्ही देशांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या सरकारमध्ये वरिष्ठ पॉलिट ब्यूरो सदस्य व प्रमुख अधिकाऱ्यांकडून उच्चस्तरीय दौरे आयोजित करण्याचे प्रस्ताव देण्यात आले आहेत. चीनने दोन्ही देशांत ‘भारत-चीन संस्कृती संवाद’ आयोजित करण्याचाही सल्ला दिला आहे. त्याशिवाय भारत-चीन व्यापार व गुंतवणूक सहकार्य मंच, भारत-चीन चित्रपट फोरमचाही प्रस्ताव ठेवला आहे.

या दौऱ्यामागील चीनचा उद्देश काय आहे?
चीनचे उद्दिष्ट स्पष्ट आहे. ब्रिक्स शिखर संमेलनासाठी चीनसाठी पाठिंबा मिळवणे असा उद्देश आहे. ब्रिक्समध्ये रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीनदेखील सहभागी होतील. चीनकडे यंदा आरआयसी (रशिया-भारत-चीन) त्रिपक्षीय अध्यक्षपदाचीदेखील संधी आहे. ब्रिक्समधील इतर नेत्यांच्या शिखर संमेलनाचे आयोजनही चीन करू शकते.

नरेंद्र मोदी चीनच्या भेटीवर जातील?
सध्याची परिस्थिती पाहता मोदींसाठी जिनपिंग यांच्यासोबत व्यक्तिगत बैठकीत सहभागी होणे राजकीयदृष्ट्या कठीण आहे. कारण सीमावाद अद्यापही सुटलेला नाही. उभय नेत्यांत ब्राझील येथे नोव्हेंबर २०१९ ला ब्रिक्स शिखर संमेलनात बैठक झाली होती. ऑक्टोबर २०१९ मध्ये जिनपिंग महाबलिपुरममध्ये एका अनौपचारिक शिखर संमेलनासाठी भारत भेटीवर आले होते.
गुलशन सचदेव, जयां मौन्ने चेयर, जेएनयू स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज, एिडटर चीफ ऑफ इंटरनॅशनल स्टडीज

बातम्या आणखी आहेत...