आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Chinese Jets Fly In Ladakh With New Changes, Experts Say It Is Not Good For India

चीन पुन्हा चिथावणीखोर हालचाली:नव्या बदलांसह लडाखमध्ये उडाले चिनी जेट, धोकादायक संकेत असल्याचे तज्ज्ञांचे मत

मुकेश कौशिक | नवी दिल्ली12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आतपर्यंत मारा करण्याची ताकद दाखवण्याचा प्रयत्न

लडाख सीमेवर चीनच्या चिथावणीखोर हालचाली सुरू आहेत. आता पूर्व लडाखमध्ये सुमारे दोन डझन फायटर जेट उडवली. हा युद्धसराव असल्याचे त्याचे म्हणणे आहे.

या सरावात चीनचे सुमारे २०-२२ लढाऊ विमाने सामील होती. हा सराव काशगर, होटान, गार गुंसा हवाई तळांवरून करण्यात आला. चीनने नुकतीच ती तयार केली आहे. आता तेथून तो प्रत्येेक प्रकारची लढाऊ विमाने उडवू शकतो. तिकडे, भारतीय लष्कराशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, चीनची विमाने त्यांच्या सीमेत होती.

तर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, चिनी विमानांतील बदल सामान्य नाहीत, तर धोकादायक संकेत देत आहेत. भारतीय वायुदलाचे माजी एअर व्हॉइस मार्शल सुनील नानोदकर यांनी भास्करला सांगितले की, चीनचा यावेळचा सराव आधीच्या तुलनेत पूर्णपणे वेगळा आहे. ज्या प्रकारच्या बदलांवर तो भर देत आहे त्यातून धोकादायक संकेत मिळत आहेत. दक्षिण चिनी समुद्रापासून भारतापर्यंत आतपर्यंत मारा करण्याची शक्ती दाखवण्याचा चीन प्रयत्न करत आहे. यासाठी मिक्स्ड फॉर्मेशन व हवेत इंधन भरण्यावर लक्ष दिले जात आहे. एखाद्या देशात एक हजार ते दीड हजार किमी आत घुसून हल्ला करण्याचा अभ्यास करत असल्याचे स्पष्ट आहे.

दरवर्षी चिनी लष्कर उन्हाळ्यात सराव करते व त्याची पूर्व सूचना औपचारिकरीत्या ज्या देशांच्या सीमांवर सराव केला जातो त्यांना दिली जाते. मात्र यावेळी सराव व सामान्य उड्डाणाशिवाय दबाव, दरारा दाखवणे आणि अाक्रमकता दाखवण्यासारखे वाटते.

बातम्या आणखी आहेत...