आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिनी स्पायशिप युआन वांग-5 लंकेत दाखल:16 ते 22 ऑगस्टपर्यंत हंबनटोटावर मुक्काम; शिपच्या हालचालींवर भारतीय नौदलाची नजर

कोलंबो4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनची हैरगिरी नौका युआन वांग-5 मंगळवारी सकाळी श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरावर पोहोचली. ही नौका 16 ते 22 ऑगस्टरपर्यंत तिथे राहील. हे हेरगिरी जहाज जवळपास 750 किमी अंतरावरील टेहळणी अगदी आरामात करू शकते. त्याच्यावर उपग्रह व आंतरखंडीय क्षेपणास्त्रांवर नजर ठेवण्याची खास यंत्रणा आहे.

यापूर्वी हे जहाज 11 ऑगस्टला लंकेत दाखल होणार होते. पण भारताच्या हरकतीनंतर लंकेने तूर्त त्याला परवानगी नाकारली होती. कारण, हंबनटोटा बंदर तामिळनाडूच्या कन्याकुमारीपासून अवघ्या 451 किमी अंतरावर आहे. त्यानंतरही लंकेने या जहाजाला हंबनटोटा बंदरावर येण्याची परवानगी दिली होती. आता भारत या प्रकरणी अलर्टवर आहे. या जहाजाच्या हालचालींवर भारताची करडी नजर आहे.

श्रीलंकेचा दावा -चिनी जहाजाला दौरा थांबवण्याचे निर्देश दिले

श्रीलंकेने चीनच्या युआन वांग -5 जहाजाला हंबनटोटा पोर्टचा दौरा रद्द करण्याचे निर्देश दिल्याची पुष्टी केली आहे. त्यानंतर चिनी दुतावासाने लंकन सरकारला जहाज डॉक करण्यासाठी योग्य ती मदत करण्याची विनंती केली. 12 ऑगस्ट रोजी चिनी दुतावासाने लंकेच्या परराष्ट्र मंत्रालयाला एक नोट पाठवून त्यात हे हेरगिरी जहाज 16 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट दरम्यान हंबनटोटावर नांगर टाकणार असल्याचे कळवले.

चीनचा दावा -श्रीलंकेवर सेशेल्सचा दबाव

चीनने श्रीलंकेच्या या जहाजाला परवानगी देण्याच्या मुद्यावर कठोर प्रतिक्रिया दिली आहे. चीन व श्रीलंका या दोन्ही देशांनी आपसातील सहकार्याची स्वतंत्रपणे निवड केली आहे. हे सहकार्य कोणत्याही तिसऱ्या देशाला टार्गेट करत नाही, असे चीनने म्हटले आहे. बीजिंगने या प्रकरणी सेशेल्स लंकेवर दबाव टाकत असल्याचा आरोपही केला आहे.

भारताचे नौदल तळ चीनच्या रडारवर

युआन वांग-5ची 2007 मध्ये बांधणी झाली होती. हे लष्करी नव्हे तर पॉवरफुल ट्रॅकिंग शिप आहे. चीन किंवा अन्य एखादा देश क्षेपणास्त्र चाचणी करत असेल तेव्हा हे जहाज सक्रिय होते. हे जहाज जवळपास 750 किलोमीटर अंतरावरील टेहळणी करू शकते. 400 सदस्यीय ही शिप पॅराबोलिक ट्रॅकिंग अँटेना व अनेक सेंसर्सनी सूसज्ज आहे.

हंबनटोटा बंदरावर पोहोचल्यानंतर या जहाजावरील रडारच्या कक्षेत दक्षिण भारतातील कलपक्कम व कुडानकुलाम सारखे प्रमुख लष्करी व आण्विक केंद्र येतील. तसेच केरळ, तामिळनाडू व आंध्र प्रदेशाचे अनेक पोर्टही चीनच्या रडारवर येतील. काही तज्ज्ञांच्या मते, चीनने भारतीय नौदलांची ठिकाणे व आण्विक केंद्राच्या हेरगिरीसाठी हे जहाज लंकेला पाठवले आहे.

चिनी जहाज उपग्रह ट्रॅकिंगमध्ये हुशार

चिनी हेरगिरी जहाज युआन वांग-5 स्पेस व सॅटेलाइट ट्रॅकिंगमध्ये तरबेज आहे. या जहाजाच्या माध्यमातून उपग्रह, रॉकेट व आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र म्हणजे आयसीबीएमच्या प्रक्षेपणावरही नजर ठेवू शकते.

अमेरिकन संरक्षण विभागाच्या अहवालानुसार, हे जहाज पीएलएची स्ट्रॅटजिक सपोर्ट फोर्स म्हणजे एसएसएफ संचलित करते. एसएसएफ थिएटर कमांड लेव्हलची संघटना आहे. ही पीएलएला स्पेस, सायबर, इलेक्ट्रॉनिक, इन्फॉर्मेशन, कम्युनिकेशन व सायकोलॉजी वॉरफेअर मिशनमध्ये मदत करते.

99 वर्षांच्या लीजवर आहे हंबनटोटा पोर्ट

चिनी हेरगिरी जहाज युआन वांग-5 13 जुलै रोजी जियानगिन पोर्टवरून रवाना झाले होते. हंबनटोटा पोर्टसाठी चीनने लंकेला 1.5 अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले आहे. या कर्जाची परतफेड करता न आल्याने चीनने हे बंदर लंकेला 99 वर्षांच्या लीजवर दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...