आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सीमेवर तणाव:चीन सीमेवर तणाव वाढला; देपसांगमध्ये पुन्हा घुसखोरी, चिनी सैन्य 18 किमी भारतीय हद्दीत : पल्लम राजू

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • याच भागात 2013-14 मध्ये दोन्ही देशांतील सैनिक आमने-सामने आले होते

पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात पेंगाँग त्सो भागात सीमेवर तणाव वाढला असून देसांगमध्ये नियंत्रण रेषेच्या आत १८ किमीपर्यंत चिनी सैन्याने घुसखोरी केल्याचे वृत्त आहे. उपग्रहाच्या छायाचित्राआधारे माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार चिनी सैन्य बॉटलनेक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागापर्यंत घुसले आहे. रेकी नाला आणि जिवान नाला नावाने हा संवेदनशील भाग ओळखला जातो. याच भागात २०१३-१४ मध्ये दोन्ही देशांतील सैनिक आमने-सामने आले होते.

माजी संरक्षण राज्यमंत्री व काँग्रेस नेते पल्लम राजू यांनी शुक्रवारी दावा केला की, देपसांग भागांत चिनी सैनिक १८ किमी भारतीय हद्दीत घुसले आहेत. टोंटी किंवा वाय जंक्शन भागात चिनी लष्कराने चांगलाच तळ ठोकला आहे.

हवाईदलाची प्रात्यक्षिके

दरम्यान, सीमेवरील तणाव लक्षात घेता लेहमध्ये भारतीय लष्कर तसेच हवाईदलाने संयुक्त युद्ध प्रात्यक्षिके केली. यात आधुनिक सुखोई विमाने तसेच चिनूक युद्ध हेलिकॉप्टर सहभागी झाली. आपसात समन्वयाच्या दृष्टीने हा सराव असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...