आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सीमावाद:चिनी सैनिक अजूनही संघर्षाच्या ठिकाणी असल्याचे मत, प्रत्युत्तरासाठी भारताचे 35 हजार जवान तैनात

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • तणावाच्या ठिकाणाहून सैनिक मागे घेतल्याचा चीनचा दावा भारताने फेटाळला

वादग्रस्त भागातून सैनिक हटवल्याचा चीनचा दावा भारताने फेटाळला आहे. सरकारने म्हटले आहे की, चर्चेनंतरही गोगरा, पेंगोग झील आणि देपसांग भागातील स्थिती खूप काही बदल झालेला नाही. चिनी लिबरेशन आर्मीने चर्चेच्या वेळी ज्यावर संमती दर्शवली होती त्याच्यावर अंमलबजावणी झालेली नाही, असे सरकारने म्हटले आहे.

चीनचे एक प्रवक्ते वेंग वेनबिन यांनी तणाव कमी होत असल्याचा दावा एक दिवसापूर्वी केला होता. चिनी प्रवक्त्याने म्हटले होते की, सीमेवर आघाडीवर तैनात दोन्ही देशांचे सैन्य आधीच बहुतांशी ठिकाणावरून मागे हटले आहे. बुधवारी सरकारने सांगितले की, चीनला उत्तर देण्यासाठी सीमेवरील वादग्रस्त ठिकाणी भारताचे आता ३५ हजार जवान तैनात आहेत.

तणाव लांबण्याच्या शक्यतेने लष्कर आता जास्त उंच भागात आगामी थंडीच्या पार्श्वभूमीवर तयारी करत आहे. सरकारने म्हटले आहे की, चीनचे सैनिक फिंगर ४ आणि फिंगर ५ मध्ये अजूनही आहेत. ते केवळ फिंगर ५ नव्हे तर फिंगर ८ मध्येही उपस्थित आहेत.

तणावादरम्यान पीव्हीसीची आयात

सीमेवरील तणावातच चीनने या स्थितीतून बाहेर येत जून महिन्यात भारताकडून विक्रमी संख्येत पीव्हीसीची आयात केली. ग्लोबल रबर मार्केटच्या अहवालानुसार चीनने जूनमध्ये भारताकडून विक्रमी २७२०७ मेट्रिक टन पीव्हीसीची आयात केली, जी मे महिन्यातील ५१७४ मेट्रिक टनाच्या तुलनेत पाचपटपेक्षाही जास्त आहे. भारतात कोरोना लॉकडाऊनच्या काळात पीव्हीसीच्या निर्यातीत वाढ झाली होती. अहवालात म्हटले आहे की, हे एक अनोखे पाऊल आहे. कारण, भारतीय पीव्हीसी मार्केट दरवर्षी सुमारे २० लाख मेट्रिक टन कमी होत आहे.