आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचीनच्या लष्कराने ५ मेपासून भारतीय भागात घुसखोरी केली आहे, दोन्ही देशांच्या कोअर कमांडरमध्ये चर्चा सुरू असली तरी तेथील स्थिती संवेदनशील आहे, अशी स्पष्ट कबुली संरक्षण मंत्रालयाने प्रथमच अधिकृतरीत्या एका दस्तऐवजात दिली. एलएसीवर बारकाईने निगराणी ठेवण्यात यावी आणि बदललेल्या स्थितीनुरूप त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी गरज मंत्रालयाने व्यक्त केली. त्याचबरोबर ही कोंडी दीर्घ काळ राहू शकते, असा इशाराही मंत्रालयाने दिला आहे. संरक्षण मंत्रालयाच्या संकेतस्थळावर वृत्त विभागात हे दस्तऐवज मंगळवारपर्यंत उपलब्ध होते. पण गुरुवारी त्यावर वाद झाल्याने ते संकेतस्थळावरून हटवण्यात आले.
मंत्रालयाने म्हटले आहे की, चीनच्या एकतर्फी अतिक्रमणामुळे पूर्व लडाखमध्ये निर्माण झालेल्या संवेदनशील स्थितीचा तपशील सांगण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी एक तातडीची पत्रकार परिषद बोलावणार आहेत. कोअर कमांडरमध्ये पाचव्या टप्प्याच्या चर्चेदरम्यान चायना स्टडी ग्रुपच्या बैठकीत झालेल्या विचारविनिमयानंतर सरकारची ही भूमिका समोर आली आहे.
खोटे बोलण्याचे कारण मोदींनी सांगावे : राहुल
काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी लडाखमध्ये चिनी घुसखोरीबाबत खरे बोलत नाहीत. याबाबत खोटे का बोलत आहेत याचे कारण त्यांनी देशाला सांगावे. पंतप्रधान मोदी अजूनही देशाला सातत्याने याबाबत चुकीची माहिती देत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.