आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Chirag Paswan Was Practicing Paying Homage To His Father Ramvias Paswan, The Video Went Viral

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'तो' व्हिडिओ व्हायरल:वडिलांनाच श्रद्धांजली अर्पण करण्याची प्रॅक्टिस करत होते चिराग पासवान; काँग्रेसने टीका करत म्हटले - 'अशा नेत्यांमुळे राजकारण बदनाम आहे'

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रॅक्टिस करत असल्याचा व्हिडिओ पाहून त्यांच्यावर टीका केली जात आहे.

आज बिहारमध्ये मतदान सुरू आहे. दरम्यान येथील लोक जनशक्ति पार्टीचे नेते आणि रामविलास पासवान यांचे सुपूत्र चिराग पासवान हे गेल्या काही दिवसांपासून आपल्या भाषणांमुळे आणि नितीश कुमार यांच्यावर साधत असलेल्या निशाण्यामुळे चर्चेत होते. मात्र आता चिराग पासवान त्यांच्याच एका व्हिडियोमुळे चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये चिराग पासवाने आपले वडील रामविलास पासवान यांना श्रद्धांजली वाहन्याची प्रॅक्टिस करत असताना दिसत आहेत.

वडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रॅक्टिस करत असल्याचा व्हिडिओ पाहून त्यांच्यावर टीका केली जात आहे. तसेच हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान काँग्रेसने चिराग पासवान नाटक करत असल्याची टीका केली आहे. या व्हिडिओमध्ये चिराग पासवान रामविलास पासवान यांच्या फोटोसमोर उभे आहेत. ते आपल्या भाषणाची तयारी करत आहेत. यावेळी ते कॅमेरॅची सेटिंग करताना दिसत आहेत. यावेळी काही लोक त्यांच्या आजुबाजूला आहेत. भाषणाची सुरुवात चिराग पासवानांनी केली मात्र पुढची ओळ विसल्याने त्यांनी रिटेक घेण्यास सांगितले.

काँग्रेसने साधला जोरदार निशाणा
दरम्यान आता काँग्रेसने रामविलास पासवान यांच्यावर हल्लाबोल केला आहे. उत्तर प्रदेश काँग्रेसच्या नेत्या पंखुरी पाठक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ ट्विट केला आहे. तसेच टीका करत त्या म्हणाल्या की, 'स्वर्गीय वडिलांच्या फोटोसमोर श्रद्धांजली देण्याऐवजी चिराग पासवानचा हा ड्रामा लाजिरवाना आहे. अशा लोकांमुळे राजकारण बदनाम आहे. जनतेला जागरुक होऊन आपल्यामधील जन प्रतिनिधीला निवडून अशा ड्रामेबाजांना राजकारणातून बाहेर करावे लागेल.'