आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Chittorgarh Man Burnt Alive In Holi Injured | Screams Of Wife And Daughter Standing Front, Latest And Update News

होळीच्या आगीशी खेळणे पडले महागात, एकाची प्रकृती गंभीर:मधोमध असलेली काठी पाडत होता, कपड्यांनी धरला पेट

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

होळीच्या आगीशी खेळणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. होळी दहनाच्या वेळी होळीच्या मधोमध असलेली काठी खाली पाडण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या कपड्याने पेट धरला. ही घटना चित्तोडगड जिल्ह्यात सोमवारी रात्री उशीरा घडली.आगीत भाजलेला व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तो होळीच्या आगीमध्ये मधोमध उभा आहे. मधोमध लागलेल्या काठी तो खाली पाडत होता. परंतू आगीशी खेळणे त्याला चांगलेच महागात पडले. त्याच्या अंगावरील कपड्याने पेट धरला. त्यानंतर तो धावत बाहेर येतो. त्यानंत घटनास्थळी उपस्थित लोकांनी आगीवर नियंत्रण आणले. त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले. त्या व्यक्तीच्या शरीराचा 50 टक्के भाजला गेला आहे. कमरेच्या खालील शरीराचा भाग गंभीररित्या भाजला गेला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

घटनेचा व्हिडिओ झाला व्हायरल
चित्तोडगड जिल्ह्यातील कपासन गावामध्ये सोमवारी रात्री उशीरा पर्यंत होळी पेटलेली होती. लोक होळीभवती आनंदोत्सव साजरा करत होते. एकमेकांवर गुलाल उधळत होते. दरम्यान, होळीच्या आगीच्या मध्यभागी ते टाकण्यासाठी गावातील बाळू कुभांर (45) हे स्वतः खांबावर चढले. आग जास्त असल्याने तो खांबावरून खाली पडला आणि आगीत अडकला.

घटनास्थळी उपस्थित त्यांची पत्नी आणि मुलगी आरडाओरडा करू लागल्याने गावातील लोक त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या दिशेने धावले. त्यानंतर बाळू स्वतः आगीतून बाहेर आला. त्यावेळी त्यांच्या संपूर्ण कपड्यांना आग लागली होती. गावातील तरुणांनी बाळूला चित्तोडगडच्या जिल्हा रुग्णालयात नेले. तेथून त्यांना उदयपूरच्या जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. बाळूचे दोन्ही हात, पाठ व पाय गंभीररीत्या भाजले होते. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

शेती करतो मातीची भांडी बनवतो
आगीत भाजला गेलेला बाळू मातीची भांडी बनवण्याचे काम करते. बाळूच्या आई-वडिलांचे निधन झाले आहे. बाळूला तीन मुली आहेत. मोठी मुलगी ललिता हिचे लग्न झाले आहे. दुसऱ्या क्रमांकाची मुलगी आंचाई (16) आणि सर्वात धाकटी मुलगी नयासा (12)वर्षांची आहे. दोघी शिक्षण घेत आहेत. बाळूला दोन बहिणी आहेत. त्यांचा तो एकुलता एक भाऊ आहे.

हे ही वाचा

होळी खेळण्यासाठी सासूरवाडीला जाणाऱ्या तरुणासह तिघांचा अपघाती मृत्यू

भरधाव वेगात असलेल्या 2 दुचाकींची धडक बसल्याने काका-पुतण्यासह 3 जणांचा मृत्यू झाला. ही टक्कर इतकी जोरदार होती की दोन्ही दुचाकींचा चक्काचूर झाला आणि दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. 13 दिवसांपूर्वीच एका तरुणाचे लग्न झाले होते. करौली जिल्ह्यातील हिंडौन शहर परिसरात हा अपघात झाला.

बातम्या आणखी आहेत...