आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा कसला उपचार?:ब्लॅक फंगसच्या उपचारासाठी रुग्णालयाने दिले 50 लाख रुपयांचे एस्टिमेट, इंदूरच्या हॉस्पिटलचा प्रताप

इंदुर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन दिवसांपूर्वी सरकारने ब्लॅक फंगसचा उपचार मोफत करण्याची घोषणा केली होती, हे आहे वास्तव

मध्यप्रदेशची राजधानी इंदुरमधील CHL हॉस्पिटलने ब्लक फंगसच्या उपचारासाठी एका रुग्णाला 50 लाख रुपयांचे एस्टिमेट दिल्याचा प्रकार उघडीस आला आहे. इतकी मोठी रक्कम पाहून डॉक्टर्सदेखील चकीत झाले आहेत. काहींनी यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, 5,000 रुपयांच्या अँटी फंगल इंजेक्शनसाठी एक लाख रुपये घेतले जात असल्याचा आरोप एका डॉक्टरने सोशल मीडियावरुन लावला आहे.

पंकज गुप्ता असे संबंधित रुग्णाचे नाव आहे. आतापर्यंत त्यांच्यावर मेंदू आणि नाकाचे ऑपरेशन झाले आहे. या प्रकाराबाबत ईएनटी स्पेशलिस्ट डॉ. प्रकाश तारे म्हणाले की, 50 लाखांइतका खर्च होऊ शकत नाही. सर्वाधिक खर्च इंजेक्शनचा असतो, बाकी एंडोस्कोपिक सर्जरी असते. तिकडे, CHL हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटने या प्रकारावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

डीन ऑफिसबाहेर 8 तास वाट पाहिल्यानंतर मिळाले 5 इंजेक्शन

या प्रकारातील एक बिडंबना पाहा. पंकज गुप्ता यांना एक लाख रुपयांचे इंजेक्शन दररोज दिले जात आहेत. आतापर्यंत 8 इंजेक्शन दिले असून, अजून 20 इंजेक्शन लागणार आहेत. पंकज गुप्ता यांच्या पत्नी अंशु गुप्ताने सांगितले की, ‘कोरोना संक्रमणातून ठीक झाल्यानंतर पतीला ब्लॅक फंगसची लागण झाली. बुधवारी सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मेडिकल कॉलेज डीनच्या ऑफिसबाहेर वाट पाहिल्यानंतर 5 इंजेक्शन मिळाले. पण, पंकज यांना दररोज 16 इंजेक्शन्सची गरज भासत आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, माझे पती एकट्याने घर चालवतात. त्यांना दररोज 1 लाख रुपयांचे इंजेक्शन लागत आहेत. आतापर्यं या उपचारात आमची सर्व बचत खर्च झाली. पाच इंजेक्शन 2.5 हजार रुपये प्रती इंजेक्शन हिसोबाने मिळत आहेत, पण उर्वरित इंजक्शन 12 ते 13 हजार रुपयांना बाजारातून खरेदी करावे लागत आहेत. त्यांना 28 दिवस इंजेक्शन द्यायचे आहे. आजून 20 दिवसांचे इंजेक्शन देणे बाकी आहे.

जानकार म्हणाले- मोठ्या ऑपरेशनमध्येही इतका खर्च लागत नाही

या प्रकरणात आम्ही कंसल्टेंट फिजीशियन डॉ. पीयूष जोशी यांच्याशी बातचीच केली. त्यांनी सांगितले की, 50 लाखांचे एस्टीमेट खूप जास्त वाटत आहे. लंग्स, हार्ट आणि लिव्हर ट्रांसप्लांटसारख्या मोठ्या सर्जरीमध्ये 50 लाखांपर्यंत खर्च होतो. याशिवाय, रुग्णाच्या परिस्थितीवरही काही गोष्टी अवलंबून असतात. हॉस्पिटलने त्यानुसार, हे एस्टीमेट दिले असेल.

बातम्या आणखी आहेत...