आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय नाट्य:केरळात ख्रिश्चन समाजाचा पाठिंबा मिळविण्यासाठी त्यांचे हितचिंतक बनून भाजपची ‘कक्कुकली’ नाटकावर बंदीची मागणी

के.ए. शाजी । काेची22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केरळमध्ये ‘द केरला स्टाेरी’ चित्रपटाला हाेत असलेल्या विराेधानंतर आता मल्याळी नाटक कक्कुकलीही वादाच्या भाेवऱ्यात सापडले आहे. काँग्रेस व माकपने द केरला स्टाेरीला विराेध करून त्यावर बंदीची मागणी केली आहे. भाजपने कॅथाेलिक बिशप्स काैन्सिलची भेट घेऊन कक्कुकलीच्या सादरीकरणाच्या बंदीला पाठिंबा दर्शवला आहे. माकपचा गड वातकरा येथे मार्चमध्ये पहिल्यांदाच चर्चकडून विराेध करण्यात आला. काैन्सिलचे अध्यक्ष कार्डिनल बेसेलियाेस क्लिमिस यांनी एक दावा केला आहे. कक्कुमली नाटकातून ख्रिश्चन धर्मातील तपस्येबाबत इतर धर्मीयांत गैरसमज निर्माण केला आहे. ही तपस्या ख्रिश्चन धर्मातील सर्वात सुंदर अशी अभिव्यक्ती हाेती. ख्रिश्चन समाज अनेक शतकांपासून शिक्षण, दान, समाजसेवा, रुग्णसेवा करत आहे. ते याेगदान अमान्य करण्यामागे एक गुप्त अजेंडा हाेता. ताे भ्रम निर्माण करणाऱ्या गाेष्टींतून पसरवण्याचे काम करण्यात आले. सत्ताधारी माकपचे राज्य सचिव एम.व्ही. गाेविंदन यांनी नाटकावरील बंदीची मागणी फेटाळून लावली.

विराेध करणाऱ्यांना कंटेंटवर टीका करण्याचा अधिकार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. गेल्या दाेन वर्षांत कक्कुमली नाटकाचे साेळा ठिकाणी सादरीकरण झाले. त्यावरून चर्च एलडीएफ सरकारवर नाराज आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत ख्रिश्चनांनी बहुसंख्येने एलडीएफला पाठिंबा दिला हाेता. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन म्हणाले, धार्मिक ध्रुवीकरण निर्माण करणे आणि राज्याविराेधात द्वेष वाढवण्याच्या उद्देशाने खाेटे बाेलत असल्याचे दिसून येते. भाजपचे सरचिटणीस जाॅर्ज कुरियन यांनी एलडीएफचा सहकारी पक्ष केरळ काँग्रेसवर आराेप केला. पक्ष नेतृत्व करत असलेल्या समुदायाचा विश्वासघात करत आहे, असे त्यांनी म्हटले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुरेंद्रन म्हणाले, सरकारने त्यावर बंदी घातली नाही तर आम्ही गप्प बसणार नाही.

केरळमध्ये भाजपचे खाते सुरू करण्यासाठी ख्रिश्चनांचा पाठिंबा गरजेचा
केरळमध्ये भाजपला खाते उघडण्यासाठी ख्रिश्चनांचा पाठिंबा गरजेचा आहे. माेदी वारंवार म्हणाले, केरळमध्ये भाजप ख्रिश्चन समाजाच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करेल. नाटकावरील वादामुळे चर्चची भाजपसाेबत जवळीक वाढेल, अशी भीती काँग्रेस व माकपला वाटू लागली आहे.