आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामणिपूरमध्ये हिंसाचारग्रस्त भागात जनजीवन पूर्वपदावर येत आहे. राज्यात हिंसाचारग्रस्त चुराचांदपूर भागात रविवारी संचारबंदी काही तास शिथिल करण्यात आली. यासोबत जनजीवन सुरळीत हाेताना दिसत आहे. लष्कर या भागात ड्रोन आणि हेलिकॉप्टरद्वारे लक्ष ठेवून आहे. यादरम्यान खाद्य पदार्थ, औषधी आणि अन्य आवश्यक सामग्री खरेदी करण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले.
शिथिलतेची मुदत संपल्यानंतर लष्कर आणि आसाम रायफल्सच्या जवानांनी शहरात ध्वज संचलन केले. २७ एप्रिलला चुराचांदपूर जिल्ह्यातून हिंसाचाराला सुरुवात झाली होती आणि पुढे राज्यभर पसरली. या हिंसाचारात आतापर्यंत ५४ जणांचा मृत्यू झाला असून १०० वर लोक जखमी झाले आहेत. लष्करानुसार, आतापर्यंत सर्व समाजातील २३ हजारांहून जास्त लोकांचा बचाव करून लष्करी छावणीत पाठवण्यात आले आहे. राज्यात सुरक्षा दलांच्या १४ तुकड्या तैनात आहेत. केंद्र सरकार आणखी २० तुकड्या राज्यात पाठवणार आहे. देशाच्या उर्वरित राज्यांनी मणिपूरमधून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याची मोहीम वेगवान केली आहे. सिक्किमने १२८ विद्यार्थ्यांना बाहेर काढले. महाराष्ट्रही आपले २२ विद्यार्थी आणण्यासाठी विशेष विमान पाठवत आहे.
नागालँडला आलेले विद्यार्थी म्हणाले- रात्र जागून काढली, चहुबाजूने गोळीबाराचा आवाज
नागालँडमध्ये कोहिमा स्थित आसाम रायफल्सने बचाव अभियानात ६०० पेक्षा जास्त नागा लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. यामध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींचा समावेश आहे. हिंसाचारग्रस्त भागांतून परतलेल्या विद्यार्थ्यांनी आपबीती सांगितले. एक विद्यार्थीनी म्हणाली, चहुबाजूने गोळीबार, स्फाेट होत आहेत. जाळपोळ होत आहे. तणावामुळे अनेक रात्री जागून काढल्या. यादरम्यान, दिल्ली युनिव्हर्सिटीच्या नॉर्थ कॅम्पसच्या आसपास राहणाऱ्या मणिपुरी विद्यार्थ्यांच्या एका गटाच्या आरोपानुसार, गुरुवारी रात्री काही विद्यार्थ्यांनी त्यांना मारहाण केली.
आता चर्चशिवाय उघड्यावर केली जातेय प्रार्थना
चर्चशिवाय आता अशा ओसाड जागी लोक उभे राहून ईश्वराची प्रार्थना करत आहेत. ख्रिश्चन धर्माचे कुकी-नागा समुदायाचे लोक म्हणाले की, चर्च पडल्याच्या वेदना आहेत, मात्र आता “प्रार्थनेचे घर’ आमचे हृदय आहे. हे प्रार्थनेच्या आत बनले आहे. अशा दिवसांतही प्रार्थना करणाऱ्या मणिपूरच्या सर्व ख्रिश्चन समुदायाला सलाम.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.