आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अलिकडेच चुरूचे तापमान ५० अंशांपर्यंत गेले असता त्याची गणना जगातील सर्वात उष्ण शहरांमध्ये हाेऊ लागली. परंतु येथे थंडीही तितकीच कडक पडते. पारा उणे ४ अंशांपर्यंत जाताे. अवघ्या सहा महिन्यात चुरूचे नागरिक तपमानातील ५४ अंशांचा फरक सहन करतात पण तरीही त्याचा त्यांच्या प्रकृतीवर काही परिणाम हाेत नाही. कारण दैनंदिन जीवनात येथील लाेकांनी कमी -अधिक तपमानाशी स्वत:ला जुळवून घेतले आहे. तपमानानुसार झाेपणे उठणे, बाहेर पडण्याच्या वेळांपासून ते कपडेही बदलले जातात. तरीही हवामानामुळे त्यांची प्रकृती खराब हाेत नाही. ५० अंशांच्या कमाल तपमानातही चुरूच्या जिल्हा रुग्णालयात उष्माघात व उलट्यांचे सरासरी केवळ १० रुग्ण दाखल हाेतात.
डी.बी. रुग्णालयाचे फिजिशियन डाॅ. आरिफ म्हणाले, प्रचंड उन्हाळ्यातही हृदयविकार, अर्धांगवायू सारखी प्रकरणे हाेत नाहीत. येथील लाेकांनी हवामानाशी स्वत:ला जुळवून घेतले आहे. उष्माघात, उलट्यांची प्रकरणे असली तरी ती गंभीर नसतात.
उन्हाळ्यात बाजारपेठ फक्त ८ तासच खुली
उन्हाळ्याच्या दिवसात सकाळी ७ वाजेपर्यंत बाजार सुरू हाेताे. १२ वाजेपर्यंत खरेदीचा माहाेल असताे. दुपारी १२ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी सारखे वातावरण असते. संध्याकाळी ६ नंतर लाेक बाहेर पडतात. बहुतांश दुकाने रात्री १० नंतर उघडी राहतात. गावातही हीच स्थिती असते. थंडीत दुकाने १० नंतरच उघडतात व संध्याकाळी ७ नंतर बंद हाेतात. लाेक आठ वाजेपर्यंत घरी जातात.
उन्हाळ्यात रबडी, ताक व थंडीत मेथीचे लाडू
उन्हाळ्यात जवळपास प्रत्येक घरी रबडी, ताक बनवले जाते. काेशिंबीर, कैरी, सांगरी, फाेफलिया, टरबूज, बडीशाेप थंडाईची मागणी उन्हाळ्यात जास्त असते. यामुळे शरीराचे तपमान नियंत्रणात ठेवणे व पाण्याची कमतरता भरून निघते. थंडीत बाजारीची भाकरी, शेंगदाणे, खजूर, गूळ व सरसोच्या तेलात भाजी बनवली जाते. डिंक तसेच मेथीचे लाडूही घराेघरी खाल्ले जातात.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.