आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजस्थानच्या चुरूमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. परराज्यातून आलेल्या एका 25 वर्षाच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नराधमांनी बलात्कार करुन पीडितेला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन खाली ढकलून दिले. मात्र सुदैवाने पीडिता वीजेच्या अडकली, त्यामुळे तिचे जीव वाचले. ही घटना चुरू जिल्ह्यातील धर्मस्तूप पोलिस चौकीहद्दीत घडली आहे. पोलिसांनी इंद्रपुरा येथील रहिवासी आरोपी, विक्रम सिंह, भवानी सिंह, देवेंद्र सिंह आणि चैनपुरा येथील सुनील या आरोपींविरोधात आयपीसी कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे प्रकरण
पीडितेने पोलिसांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, चार जणांनी दारु पिऊन माझ्यावर बळजबरीने अश्लिल कृत्य केले. त्यानंतर त्या नराधमांना असे वाटले की, घडलेला प्रकार पीडित तरुणी सांगुन देईल. त्यामुळे त्यांनी तिला जीवे मारण्याची योजना आणखी. दोरीच्या साहाय्याने पीडितेला बांधून इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन नराधमांना तिला खाली ढकलून दिले. मात्र सुदैवाने दोरी खाली असलेल्या वीजेच्या खांबामध्ये अडकली. त्यामुळे पीडितेला जीव वाचले आहे.
सुमारे दोन तास वीजेच्या खांबावर अडकली पीडिता
नराधमांना पीडितेला दुसऱ्या मजल्यावरुन फेकल्यानंतर पीड़िता खांबामध्ये अडकली. मदतीसाठी तिने आरडाओरड केली, मात्र कुणीही तिची मदत केली नाही. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांनी कळताच पोलिसांनी धाव घेत तिला, खांबावरुन खाली काढले. स्थानिकांनी सांगितले की, सुमारे दोन तास पीडित तरुणी खांबामध्ये अडकली होती. पीडितेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
कामाचे अमिष दाखवून दिल्लीहून रुचूमध्ये बोलवण्य़ात आले होते
पोलिस उप-अधिक्षक ममता सारस्वत यांनी सांगितले की, पीडित तरुणी आसामची आहे. सध्या ती दिल्लीत राहत असून, लहान-सहान काम करत होती. पीडितेच्या म्हणण्यानुसार, चुरू येथील रहिवासी सुनील उर्फ राजू याने तिला तिच्या कामासाठी आणखी पैसे मिळतील, असे आश्वासन देऊन चुरू येथे बोलावले होते. सुनीलच्या म्हणण्यानुसार ती चुरूला पोहोचली.
तेव्हा बसस्थानकावर एक तरुण तिला घेण्यासाठी आला. यानंतर तरुणीला गाडीत बसवून खोलीत नेले आणि उद्या काम करून देतो, असे सांगितले. पीडितेने पुढे सांगितले की, विक्रम राजपूत, भवानी, देवेंद्र सिंग आणि सुनील यांनी आधी खोलीत दारू पिण्यास सुरुवात केली, त्यानंतर आरोपी देवेंद्रने मला कामासाठी नाही तर दुसऱ्या कामासाठी बोलावले आहे, अशी धमकी दिली. त्यानंतर सर्वांनी एकामागून एक बलात्कार केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.