आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Cigarette Packs Should Be Clear Of Harmful Chemicals, And Efforts Should Be Made To Prevent Death

भास्कर एक्स्क्लुझिव्ह:सिगारेटच्या पाकिटावर स्पष्ट असावा त्यातील घातक रसायनांचा उल्लेख, मृत्यू टाळण्यासाठी प्रयत्न सुरू

नवी दिल्ली6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात उत्पादित प्रत्येक बिडी आणि सिगारेटमध्ये किती घातक रसायने असतात हे कोणालाच माहीत नाही. ते तपासण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. जगातील अनेक देश सिगारेटमधील निकोटीनचे प्रमाण कमी करून मृत्यू कमी करत असताना भारतात ही परिस्थिती आहे. उदाहरणार्थ, अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेच्या फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन टोबॅको कंट्रोलची (एफसीटीसी) सदस्य नाही, तरीही सिगारेटमधील निकोटीनचे प्रमाण कमी करण्यासाठी धोरण निश्चित करत आहे. दुसरीकडे, भारत एफसीटीसीचा सदस्य आहे, तरीही आतापर्यंत या दिशेने काहीही वाटचाल झालेली नाही. त्यामुळेच उत्पादन कंपन्यांची मनमानी सुरू आहे. पण आता केंद्र सरकारने सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायद्यात बदलाची प्रक्रिया सुरू केली आहे. याअंतर्गत कंपन्यांना सिगारेटच्या पाकिटांवर त्यातील घातक रसायने व त्यांचे प्रमाणही नमूद करणे बंधनकारक असेल. आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, सिगारेटमधील घातक रसायनांच्या चाचणीसाठी तीन जागतिक दर्जाच्या प्रयोगशाळा स्थापन झाल्या आहेत. वैज्ञानिक समिती स्थापन करण्यात येणार आहे. ती या रसायनांच्या चाचण्यांबाबत निर्णय घेईल. येत्या दोन-तीन महिन्यांत तपासाच्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरची (एसओपी) ब्लू प्रिंट तयार होईल, असा विश्वास आहे.

कायद्यात बदल करणे गरजेचे : डॉ. एस. के. अरोरा
तंबाखूवरील निर्बंधांच्या कार्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचा पुरस्कार मिळालेले डॉ. एस.के. अरोरा a की, कायदा बदलण्याची गरज आहे. त्यानंतरच कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांमधील घातक रसायनांचे प्रमाण उघड करणे बंधनकारक असेल. कंपन्यांच्या दाव्यांचीही चौकशी केली जाईल. सिगारेट आणि बिडीमध्ये निकोटीनसह सुमारे ७ हजार प्रकारची रसायने असतात. यापैकी २०० प्रकार विषारी आहेत. कर्करोगास कारणीभूत ६९ रसायने आहेत. त्यावर नियंत्रण ठेवल्यास लाखो मृत्यू टाळता येतील.

बातम्या आणखी आहेत...