आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Cinema Halls Open News Today Update: Multiplexes To Reopen With 50% Capacity From October 15, Government Issue SOP

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

15 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे खुली:थिएटरमध्ये निम्म्या सीटचे बुकिंग, कोरोनाबाबत जागरूकतेवर 1 मिनिटाचा लघुपट बंधनकारक; माहिती-प्रसारण मंत्रालयाची एसओपी

नवी दिल्ली7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोरोनादरम्यान 7 महिन्यांनंतर मल्टिप्लेक्स आणि सिनेमा हॉल सुरू करण्याची तयारी सुरू आहे. - Divya Marathi
कोरोनादरम्यान 7 महिन्यांनंतर मल्टिप्लेक्स आणि सिनेमा हॉल सुरू करण्याची तयारी सुरू आहे.
  • केंद्राने परवानगी दिली असली तर राज्यात मात्र चित्रपटगृहे बंदच राहतील

कोरोनामुळे गेल्या तब्बल ७ महिन्यांपासून बंद असलेली देशभरातील चित्रपटगृहे येत्या १५ ऑक्टोबरपासून उघडता येणार आहेत. त्यांच्या संचालनासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने मंगळवारी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) जारी केली.

काेरोनासाठी तयार केलेले कंटेनमेंट झोन वगळता इतर भागांत ५०% क्षमतेसह मल्टिप्लेक्स आणि सिनेमा हॉल सुरू केले जाऊ शकतील. त्यासाठीची पहिली अट म्हणजे, दोन लोकांमधील आसन रिकामे ठेवावे लागेल. ज्या आसनावर प्रेक्षक बसेल, त्याच्या अगदी मागची जागा रिकामी राहावी, अशी आसन व्यवस्था असेल.

थिएटरमध्ये चित्रपट सुरू असताना प्रेक्षकांसह कर्मचाऱ्यांनाही मास्क लावणे बंधनकारक असेल. चार भागांत एसओपी जारी करताना माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, शोच्या आधी आणि तो संपल्यानंतर प्रेक्षकांना कोरोना जागरूकतेवर एक मिनिटाचा लघुपटही दाखवावा लागेल.

सिंगल स्क्रीन हॉल बुकिंग विंडो वाढवा

> देशभरातील सिंगल स्क्रीन चित्रपटगृहामध्ये तिकिटांच्या बुकिंगसाठी चालकांना जास्त खिडक्या उघडाव्या लागतील.

> चित्रपटांच्या तिकिटांचे बुकिंग दिवसभर असावे. अॅडव्हान्स बुकिंगची सुविधा मिळावी. आरोग्य सेतू अॅपच्या वापराचा सल्ला दिला जात आहे.

ही सावधगिरी : इंटरव्हलचा कालावधी वाढवला जाऊ शकेल

> लोक रांगेत जावे म्हणून इंटरव्हल कालावधी वाढ करता येणे शक्य.

> अॅक्सेस पॉइंट, ऑनलाइन सेल्स पॉइंट, लॉबी व वॉशरूम यांसारख्या भागांत लोकांना संसर्गापासून वाचण्याच्या पद्धती सांगण्याची व्यवस्था करावी लागेल.

> दोन शोच्या दरम्यानची वेळ वेगवेगळी असेल. एक संपल्यानंतर व दुसरा सुरू होण्याची वेळ वेगळी.

> शो संपल्यानंतर डिस्टन्सिंगसाठी लोकांना त्यांच्या रांगेच्या हिशेबाने बाहेर काढले जाईल.

> शो संपल्यानंतर संपूर्ण हॉल सॅनिटाइज हाेईल. नंतर दुसऱ्या शोसाठी लोक बसू शकतील.

> कुणी पॉझिटिव्ह आढळले तर परिसर सॅनिटाइझ करावा लागेल.

प्रवेशाचे नियम : थर्मल स्क्रीनिंग होईल

> काँटॅक्ट ट्रेसिंगसाठी संपर्क क्रमांक द्यावा लागेल. थर्मल स्क्रीनिंग होईल. मास्क सक्ती.

> एंट्री-एक्झिट पॉइंट व कॉमन एरियात टच फ्री मोडमध्ये हँड सॅनिटायझरची व्यवस्था करावी लागणार आहे.

> लक्षणे नसलेल्यांनाच प्रवेश मिळेल. जे कोराेनाचे दिशानिर्देश मानणार नाहीत, त्यांच्याशी कठोरपणे वागावे.

> हॉलबाहेर कॉमन एरियात ६ फूट अंतरासाठी जमिनीवर मार्कर लावावे लागेल.

हॉलमध्ये अशी व्यवस्था : रिकाम्या आसनावर ‘नॉट टू बी ऑक्युपाइड’ लिहावे लागेल

> चित्रपटगृहांत ५०% आसनेच बुक करता येतील. एक आसन सोडूनच बुकिंग करता येईल.

> इतर आसनांवर ‘नॉट टू बी ऑक्युपाइड’ लिहावे लागेल. त्यावर टेप किंवा मग स्पष्ट दिसेल अशी खूण करावी लागेल.

> एका प्रेक्षकाच्या मागे दुसरा प्रेक्षक बसणार नाही. रिक्त आसनामागचे आसन बुक होईल. क्रॉस व्हेंटिलेशन राहील व एसी २४ ते ३० अंशांवर ठेवावा लागेल.

खाण्यापिण्याची सुविधा : फक्त सीलबंद खाद्यपदार्थच मिळतील

> फक्त सीलबंद खाद्यपदार्थांनाच परवानगी मिळेल. त्यासाठी जास्त काउंटर ठेवावे लागतील. ऑनलाइन पेमेंटला प्रोत्साहन द्यावे लागेल.

> चित्रपटगृहात अन्नपदार्थ आणि पेय पदार्थ पुरवले जाणार नाहीत.

महाराष्ट्रात लवकरच...

मुंबई | राज्यात चित्रपटगृहे खुली करण्याचा राज्य सरकारचा विचार असून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली. केंद्राने परवानगी दिली असली तरी राज्य सरकारने त्यावर शिक्कामोर्तब करणे आवश्यक आहे. चित्रटपगृहांच्या बाबतीत सरकार सकारात्मक विचार करेल, असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...